जकातपर्यायी स्थानिक संस्था करावरून सध्या सुरू असलेले अनेक उलटसुलट प्रवाह आणि व्यापाऱ्यांमधील साशंकता पाहता, ही करप्रणाली नेमकी काय आहे, याबाबत व्यापारी व सर्वसामान्य ग्राहकांमध्ये जाणीव-जागृतीसाठी ‘मराठी व्यावसायिक उद्योजक व्यापारी मित्रमंडळा’ने पुढाकार घेतला आहे. एलबीटी लागू झाल्यास व्यापारी व ग्राहकांवर त्याचे बरे-वाईट परिणाम काय होऊ शकतील, हे समजावून सांगणाऱ्या प्रसिद्ध करसल्लागार दीपक बापट यांच्या दोन व्याख्यानांचे मंडळाने आयोजन केले आहे. बुधवारी २२ मे रोजी सायंकाळी ७ वाजता, चित्तपावन ब्राह्मण संघ, निकतवारी लेन, गिरगाव येथे, तर शुक्रवारी २४ मे रोजी सायंकाळी ७ वाजता, अखिल भारतीय कीर्तन संस्था (विठ्ठल मंदिर), जोशी सभागृह, डी. एल. वैद्य मार्ग, दादर (प.) येथे होत असलेली ही व्याख्याने सर्वासाठी खुली व विनामूल्य आहेत.