अपेक्षित स्थिर व्याज दराच्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरणाची दखल भांडवली बाजारानेही मंगळवारी घेतली नाही. सेन्सेक्स अवघ्या २३.७४ अंशांनी वाढून २६,१६९.४१ वर गेला. तर १९.६५ अंश वाढीसह निफ्टी ७,९५४.९० पर्यंत पोहोचला.
सोमवारी उशिरा जाहीर झालेल्या चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीतील विकास दराच्या आकडेवारीनंतर बाजारात तेजी अपेक्षित असताना रिझव्‍‌र्ह बँकेच्या अपेक्षेप्रमाणे स्थिर व्याज दर ठेवण्याच्या निर्णयाचे सावट काही प्रमाणात बाजारात उमटले. सलग चौथ्या सत्रात वाढणारा सेन्सेक्स आता गेल्या तीन आठवडय़ाच्या वरच्या टप्प्यावर पोहोचला आहे. निर्देशांकाची ही ६ नोव्हेंबरनंतरची वरची पातळी आहे. गेल्या तीन व्यवहारात मुंबई निर्देशांक ३६९.९२ अंशांनी वाढला आहे. डॉलरच्या तुलनेत वधारलेल्या रुपयाचीही दखल बाजाराने निर्देशांकांमध्ये भर नोंदविताना घेतली. तर व्याज दराशी संबंधित समभागांमध्ये संमिश्र चित्र दिसले.

व्याजदर संवेदनशील समभागांचा संमिश्र कल

इंडसइंड बँक रु. ९४०.१० (+०.७१%)
एचडीएफसी बँक रु. १,०८१.४० (+०.५१%)
अ‍ॅक्सिस बँक रु. ४६१.६५ (-१.५४%)
बँक ऑफ बडोदा रु. १७७.४० (-१.३६%)
यूनिटेक रु. ७.२५ (+२.४०%)
डीएलएफ रु. ११७.८० (+२.२६%)
टाटा मोटर्स रु. ४१७.४० (-१.४१%)
अशोक लेलॅण्ड रु. ९३.३५ (-१.२२%)