बाजारपेठ ही नेहमीच अस्थिर असते. तसे नसते तर जोखीम नावाची गोष्टच अस्तित्वात नसती. नेहमी कोणत्याच एका गोष्टीची चलती नसते. अन्यथा त्या गोष्टी मुळात घडल्याच नसत्या.
– बेन कार्लसन
गेल्या काही आठवडय़ांमध्ये जागतिक बाजारपेठेतली सर्वात प्रभावशाली अर्थव्यवस्था म्हणून चीनला सर्वाधिक पसंती देण्यात आली आहे. ‘पीपल्स बँक ऑफ चायना’च्या ११ ऑगस्ट या एका दिवसात झालेल्या सर्वाधिक घसरणीकडे पाहता ही घसरण अशीच होत राहिली तर त्याचा काय जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल? व्यापक दृष्टीने पाहिले तर असे लक्षात येईल की चीनचे चलन असणाऱ्या युआनची या घसरणीत भर घालण्याची क्षमता हेच त्याच्या अवमूल्यनामागचे प्रमुख कारण आहे. हे चक्र भेदणे अनेक विकसित देशांनाही शक्य झालेले नाही.

या नकारात्मकतेचा मुख्य स्रोत हा तीन घटकांमध्ये सामावलेला आहे. पहिला म्हणजे चिनी अर्थव्यवस्थेची मूळपदी येण्याची क्षमता आणि जागतिक विकासामधील सातत्यपूर्ण योगदान. कारण गेल्या वर्षांत जागतिक सकल राष्ट्रीय उत्पादनामध्ये झालेल्या एकूण विकासापकी अर्धा विकास ही चीनची देणगी आहे. दुसरे म्हणजे, चिनी युआनच्या अवमूल्यनावर इतर देशांची प्रतिक्रिया काय असेल? हे करत असताना त्यांच्या स्वत:च्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर त्यांना मोठा आघात होऊ द्यायचा नाही. हा एक अनुत्तरीतच प्रश्न आहे. आणि शेवटचे म्हणजे जागतिक पातळीवरचा विकास लक्षात घेता अधिक परताव्याची भूक किंवा कमी जोखमीची सुरक्षा यावर गुंतवणुकीचे निर्णय घेतले जातील.
२०११ पासून चीनच्या विकासाचा वेग हळूहळू मंदावत गेला. २०११ मध्ये चलनवाढ आटोक्यात आणण्यासाठी चीन सरकारने दर वाढवल्यानंतर तर या मंदीला आणखी बळकटी मिळाली. चीनच्या झपाटय़ाने झालेल्या विकासामुळे गेल्या दशकभरात जागतिक अर्थव्यवस्थेला एक आकार प्राप्त झाला. त्यामुळे कंपनी योजना, आíथक योजना आणि भौगोलिक-राजकीय निर्णयांनाही वेग आला. चीनच्या अर्थव्यवस्थेला लाभलेली ही गती चिरकाळ टिकेल असे वाटत होते. जो नंतर निरंतर नफा आणि भांडवलाचा मुख्य स्रोत बनेल. चीनचे जागतिक लागेबांधे व्यापक आणि दूरगामी होते. अमेरिका, युरोप आणि जपानसारख्या बलाढय़ अर्थव्यवस्थांनी जिथे भांडवलाचा पुरवठा कमी केला तिथे बऱ्याचशा उदयोन्मुख अर्थव्यवस्थांनी स्वत:ला तंदुरुस्त राखण्यासाठी चीनकडून मोठय़ा प्रमाणावर उद्योग मिळवला. विविध मंजुरीमुळे होणारे अतिरिक्त पतन टाळण्यासाठी रशियाने चीनकडे आपला रोख वळवला. तेलाच्या किमती घसरल्याने निर्माण झालेली आíथक पोकळी भरून काढण्यासाठी रशियाला हे पाऊल उचलावे लागले. व्हेनिझुएला, नायजेरिया आणि युक्रेन यांनी मोठय़ा प्रमाणावर चीनकडून र्कज घेतले आहे. कारण चीनने त्यांना स्वस्त्यात कर्जे देऊ केली.

चीनवरच्या अनिश्चिततेमुळे ब्राझीलची गंटागळ्या खाणारी अर्थव्यवस्था थोडीफार किनाऱ्याला लागू शकते. कमी पतमूल्यांकन, वाढती चलनवाढ आणि मंदावलेला विकास ही या अर्थव्यवस्थेपुढची काही आव्हाने आहेतच.२०१४ च्या उन्हाळ्यात तेलाच्या किमती घसरू लागल्याने ही समस्या महिन्यागणिक वाढू लागली कारण वायदा वस्तूंमध्ये आलेली घसरण. चीनच्या औद्योगिक विकासामध्ये किरकोळ घट झाल्याचा परिणाम सबंध जगावर झाला. लोखंडाच्या किमती गेल्या जवळपास १० वर्षांपासून वाढत आहेत.

संपूर्ण चीनभर चालू असलेल्या स्टीलनिर्मिती आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीमधला तो एक महत्त्वपूर्ण घटक आहे. चीनचा आíथक विकास खुंटल्यामुळे आणि वायदा वस्तूंच्या किमतीही घसरल्यामुळे या क्षेत्राने गुंतवणुकीचे प्रमाणही कमी केले आहे.
चीनला आपल्या चलनाचे योग्य व्यवस्थापन करता आले नाही. युआनचे दोन टक्के अवमूल्यन करण्यामागच्या हेतूबद्दलही या देशाला पुरेसे मार्गदर्शन करता आले नाही. त्याचबरोबर औद्योगिक उत्पादन आदी आकडय़ांचे आकुंचन जे नुकत्याच केलेल्या वाचनात खाली गेले होते ते अर्थव्यवस्थेतील अडखळत आहेत. चीनचा आंतरराष्ट्रीय व्यापार हळूहळू आक्रसत चालला आहे. मात्र जागतिक व्यापारामध्ये सिंहाचा वाटा असणाऱ्या या देशातल्या किरकोळ घटनांचे मोठे पडसाद उमटत आहेत.
निर्यातीवर मोठय़ा प्रमाणावर अवलंबून असणाऱ्या अर्थव्यवस्थांसाठी अवमूल्यन हा वेळोवेळी वापरण्यात आलेला आणि खराखुरा तोडगा आहे.

आर्थिक बळ आणि मनुष्यबळाच्या वाढत्या दरांमुळे चिनी अर्थव्यवस्थेला थोडा पािठबा मिळाला आणि गाडी पुढे जात राहिली. तरीही नुकतीच औद्योगिक उत्पादनामध्ये झालेली घट, कोसळलेली स्थावर मालमत्ता बाजारपेठ आणि अडखळत उभ्या असलेल्या भांडवली बाजारपेठेमुळे निर्यातीसारख्या पारंपरिक मार्गावरच अधिक विसंबून राहण्याजोगी परिस्थिती निर्माण झाली.
लेखक एडलवाइज फायनान्शिअल सíव्हसेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष व संशोधन प्रमुख आहेत.