देशातील आघाडीच्या प्रवासी वाहन व दुचाकी निर्माती कंपन्यांच्या समभाग मूल्याने शुक्रवारी भांडवली बाजारात कमालीची अस्वस्थता निर्माण केली. शुक्रवारी जाहीर झालेल्या दोन कंपन्यांच्या निकालांवर बाजारात दोन टोकाच्या प्रतिक्रिया उमटल्या. मारुती सुझुकी व हीरो मोटोकॉर्प कंपनीने सरलेल्या तिमाहीत नफ्यामध्ये अनुक्रमे ७९.४ टक्के फायदा तर ४.८६ टक्के तूट नोंदविली आहे. परिणामी, दिवसभरात मारुतीचा समभाग १,६९०.४० रुपयांवर जाताना वर्षांच्या उच्चांकाला पोहोचला. दिवसअखेर मारुतीचा समभाग ५.५ टक्क्यांनी उंचावला, तर हीरोचे समभाग मूल्य १.२ टक्क्यांनी खालावले. आयसीआयसीआय बँकेने निव्वळ नफ्यातील २१ टक्के वाढ नोंदवूनही कंपनी समभाग मूल्य ३ टक्क्यांनी आपटले होते.

ग्राहकांच्या संपत्तीवृद्धीची निकड पूर्ण करणारी ‘सिंगल पे एंडोमेंट अ‍ॅश्युरन्स प्लॅन’ ही योजना एडेल्वाइज टोक्यो लाइफ इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडने दाखल केली आहे.