सुधीर जोशी

गेल्या सप्ताहातील उत्साही अर्थसंकेतास सप्ताहाच्या सुरुवातीलाच करोना रुग्णांची घटणारी संख्या व फायझरसमवेत सीरम व बायोटेकने औषध वापराची मागितलेली परवानगी अशा सकारात्मक गोष्टींची जोड मिळाली. परदेशी गुंतवणूकदारांची तडाखेबंद खरेदी (नोव्हेंबरपासून आतापर्यंत ८० हजार कोटी) व भारतातील गुंतवणूकदारांचा बाजारावरील वाढता विश्वास बाजाराला नव्या उच्चांकावर घेऊन गेला. साप्ताहिक तुलनेत सेन्सेक्स व निफ्टी सलग सहाव्या सप्ताहात वरती बंद झाले.

d subbarao rbi former governor
तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता होऊनही भारत गरीबच राहणार – RBI चे माजी गव्हर्नर
vijay kelkar
अग्रलेख: कराग्रे वसते लक्ष्मी..
whatsapp and instagram down
व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम सेवा खंडीत; जाणून घ्या मध्यरात्री काय झालं?
Pavan Davuluri
मायक्रोसॉफ्टची धुरा भारतीय वंशाच्या पवन दावुलुरी यांच्या हाती; जाणून घ्या त्यांची कारकीर्द?

अ‍ॅग्रो टेक फूड्स ही तयार खाद्य पदार्थ व घरी पदार्थ बनविताना लागणारे खाद्य साहित्याची विक्री करणारी कंपनी आहे. सनड्रॉप, ACT II सारख्या नाममुद्रेंतर्गत तेल, पीनट बटर, पॉप कॉर्न्‍स अशी या कंपनीची उत्पादने प्रसिद्ध आहेत. लहान पॅकमध्ये विकले जाणारे खारे/मसाला दाणे व अन्य उत्पादनात कंपनी पाय रोवते आहे व त्यासाठी आंध्र प्रदेशात कारखाना उभारत आहे. कंपनीमधील गुंतवणूक मध्यम काळामध्ये फायदा मिळवून देईल.

टाटा सन्स ही प्रवर्तक कंपनी आपल्या समूहातील काही कंपन्यांमधील भांडवली हिस्सा वाढवत आहे. त्यातील एक म्हणजे टाटा केमिकल्स. त्यामुळे गेले काही दिवस कंपनीच्या समभागात सातत्याने वाढ झाली आहे. अनेक वर्षे कोशात राहिलेल्या या कंपनीने स्वत:चा खाद्य पदार्थ उद्योग टाटा ग्लोबलच्या रूपाने वेगळा केल्यावर व खत उद्योगातून बाहेर पडल्यावर स्वत:च्या मूळ व्यवसायावर लक्ष केंद्रित केले आहे. कंपनीच्या ‘स्पेशालिटी केमिकल्स’ उद्योगाने गेल्या सहा महिन्यांत उत्पन्नात प्रभावी भर घातली आहे. चीनमधील सोडा अ‍ॅश उत्पादनातील घट कंपनीच्या पथ्यावर पडली आहे. बाजारातील मोठय़ा घसरणीमध्ये संधी मिळाल्यास हा समभाग घेऊन ठेवण्यासारखा आहे.

सोलारा अ‍ॅक्टिव्ह फार्मा सायन्सेस या फक्त एपीआय उत्पादन करणाऱ्या कंपनीला चीनमधील कंपन्यांवरील अवलंबन कमी करण्यासाठी पर्यायी स्रोत शोधण्याच्या अनेक कंपन्यांच्या प्रयत्नांचा फायदा होईल. सोलाराकडे ५० मोलेक्युलच्या उत्पादनांची क्षमता, दोन संशोधन केंद्रे व सहा उत्पादन कारखाने आहेत. कंपनीच्या सप्टेंबर अखेरच्या सहा महिन्यांतील नफ्यात गेल्या वर्षांच्या तुलनेत २२ टक्के वाढ झाली आहे. कंपनीमध्ये टप्प्याटप्प्याने केलेली गुंतवणूक फायदा देईल.

हवे. इंधन तेलवाढीपाठोपाठ येऊ शकणारी महागाई सध्या बाजाराला सर्वात जास्त धोकादायक ठरू शकते. त्यामुळे तेजीची मजा घेताना रोज थोडी नफावसुली करायला हवी. नफावसुली केल्यावर समभाग थोडे वर गेले तरी हरकत नाही.

बाजार उच्चांकावर असताना आपल्या पोर्टफोलियोमध्ये आयटीसी, कोल इंडिया, टीसीएस, इन्फोसिससारख्या जास्त लाभांश देणाऱ्या व बचावात्मक कंपन्यांचे प्रमाण वाढवण्यास हरकत नाही.