09 August 2020

News Flash

आठवडय़ाची मुलाखत: सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान बाजाराला गती

जागतिक वेधशाळा व भारताच्या हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा उत्तम पाऊस

गेल्या अनेक आठवडय़ांपासून २६ हजारांच्या खाली रेंगाळणाऱ्या सेन्सेक्सने सोमवारी अचानक ४०० हून अधिक अंशांची उसळी घेतली. अशा स्थितीत बाजारातील खेळीवर प्रकाश टाकत आहेत एडलवाइज ब्रोकिंगच्या रिटेल अ‍ॅडव्हायजरीचे प्रमुख राहुल जैन –

भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रवासाबाबत काय सांगाल?

जागतिक वेधशाळा व भारताच्या हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा उत्तम पाऊस पडण्याची शक्यता आहे. या वर्षी सरासरीहून १०५-११०% अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. दोन दुष्काळाने ग्रामीण अर्थव्यवस्था संथ झाली आहे. पावसाने या संथ झालेल्या अर्थव्यवस्थेला उभारी मिळण्याची शक्यता असल्याने बाजारालासुद्धा या वर्षी उत्तम पावसाची अपेक्षा आहे. तेव्हा अर्थव्यवस्थाही वेग धरेलच.

पण कंपन्यांच्या नफ्यात वाढ होत नसल्याने संस्थात्मक गुंतवणूकदारा जोमाने गुंतवणूक करताना दिसत नाहीत?

संथ झालेल्या अर्थव्यवस्थेला गती येण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल. सप्टेंबर – ऑक्टोबर २०१६ दरम्यान नफ्यात माफक वाढ दिसायला सुरुवात होईल. या वेळी बाजाराने जोर पकडलेला दिसून येईल.

नव्या दमाच्या ‘डिस्काउंट ब्रोकर्स’नी तुमच्यासारख्या पारंपरिक दलाली व्यवसाय करणाऱ्यांसमोर तगडी स्पर्धा निर्माण केली आहे.
मी या मताशी सहमत नाही. बाजार म्हटला की ग्राहकाच्या वेगवेळ्या गरजा असतात. तसेच शेअर बाजारातसुद्धा कोणी स्वयंप्रेरणेने सौदे करणारे असतात तर कोणी दलालाच्या मार्गदर्शनाखाली सौदे करणारे आहेत. त्यामुळे ‘डिस्काउंट ब्रोकर्स’नी स्पर्धा निर्माण केली असे म्हणणे चुकीचे आहे. त्यांच्या बरोबरीने आमच्यासाठीसुद्धा या बाजारात काही जागा आहे व दोन्ही प्रकारच्या दलाली पेढय़ांना इथे स्थान आहे.

मोबाइल ट्रेिडग करणाऱ्या वैयक्तिक गुंतवणूकदारांची संख्या वेगाने वाढत आहे. या प्रकारच्या सौद्यांचा कल आहे, असे वाटते?
सर्वानाच बाजाराच्या व्यवहाराच्या वेळात संगणकासमोर बसून सौदे करणे शक्य नसते. स्मार्टफोनशी सख्य जुळलेल्या नव्या पिढीला संगणकासमोर बसणे सक्तीचे नसल्याने मोबाइल ट्रेिडग सोयीचे वाटते. आमच्या ८० शाखा व २,००० हून अधिक उपदलालांच्या साहाय्याने आम्ही हे तंत्रज्ञान आमच्या ग्राहकापर्यंत पोहचविले आहे. आमचे ८०% ग्राहक या तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत.

ग्राहकांपेक्षा दलाली पेढय़ांच्या फायद्याचे असल्याने ‘प्रीपेड ब्रोकरेज’ ही संकल्पना ग्राहकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न होत आहे असे दिसते का?
तुम्ही कुठल्या प्रकारचे सौदे करता या वर तुमचा प्लान ठरतो. तुम्ही संख्येने अधिक शेअर खरेदी करून अल्प नफ्यात बाहेर पडणारे असाो तर तुमच्यासाठी प्रीपेड प्लॅन नक्कीच फायद्याचा ठरतो. परंतु संख्येने कमी व थोडा अधिक नफा पदरात पडल्यावर बाहेर पडणारे असाल तर तुमच्यासाठी वेगळे प्लॅन असतात. याबाबत माझे गुंतवणूकदारांना असे सांगणे आहे की तुमची गरज लक्षात घेऊन तुमचा प्लॅन ठरवा.

‘ट्रेडर्स लाउंच’ हा मंच एडलवाइजने शेअर बाजारात व्यवहार करणाऱ्यांना उपलब्ध करून दिलात. हा मंच उपलब्ध करून देण्याची आवश्यकता तुम्हाला का भासली?
शेअर बाजारात व्यवहार करणाऱ्यांचे प्रामुख्याने ट्रेडर्स व गुंतवणूकदार जे कोणी एकाच दिवसात खरेदी-विक्री करतात अशा प्रकारच्या व्यवहार करणाऱ्यांना हे ‘ट्रेडर्स लाऊंच’ हे सोयीचे आहे. या मंचावर एकाच वेळी आलेल्या किती बातम्या सकारात्मक व किती नकारात्मक आहेत. सध्या बाजाराचा कल असा आहे. तंत्र विश्लेषण आदी सर्व एकाच मंचावर आम्ही उपलब्ध करून दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2016 7:41 am

Web Title: market will rise in the month of september and october
Next Stories
1 ‘एमसीएक्स’च्या ‘सीईओ’पदी मृगांक परांजपे
2 जानेवारी – एप्रिलदरम्यान ‘सिप’ संख्येत वाढ
3 ‘सीआयआय’चे१० जिल्ह्य़ांमध्ये जलकार्य
Just Now!
X