08 August 2020

News Flash

मारुतीकडून १.५ कोटी वाहन उत्पादन पार

गेल्या तीन दशकांपासून भारतीय वाहन बाजारपेठेवर वरचष्मा असलेल्या मारुती सुझुकीने वाहन निर्मितीतील १.५ कोटींचा टप्पा पार केला आहे.

| May 13, 2015 06:28 am

गेल्या तीन दशकांपासून भारतीय वाहन बाजारपेठेवर वरचष्मा असलेल्या मारुती सुझुकीने वाहन निर्मितीतील १.५ कोटींचा टप्पा पार केला आहे. सेदान श्रेणीतील स्विफ्ट डिझायरही १.५ लाखावी कार कंपनीने आपल्या मानेसर प्रकल्पातून बाहेर काढली आहे.
विविध १३ हून अधिक प्रकारच्या वाहनांसह कंपनी प्रवासी वाहन विक्रीत अव्वल आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मारुती ८००, अल्टो, व्हॅगन आर, ओम्नी, स्विफ्ट, डिझायरसारख्या पसंतीच्या वाहनांच्या जोरावर कंपनीने हा अनोखा प्रवास अनुभवला आहे. डिसेंबर १९८३ मध्ये सर्वप्रथम मारुतीसह कंपनीने वाहन उत्पादनाला सुरुवात केली होती. या तीन दशकांमध्ये कंपनीच्या ८००च्या २९ लाख, अल्टो श्रेणीत ३१ कार, ओम्नी १७ लाख तर व्हॅगन आर १६ व स्विफ्ट १३ आणि स्विफ्ठ डिझायर १० लाख तयार झाल्या आहेत.
मारुती सुझुकीने वाहन निर्मितीचा १० लाखावा टप्पा दोन दशकांपूर्वी, १९९४ मध्ये गाठला होता. तर ५० लाख वाहन निर्मिती १० वर्षांपूर्वी, २००५ मध्ये झाली होती. २०११ मध्ये कंपनीने एक कोटी वाहन निर्मिती नोंदविली.
नजीकच्या भविष्यात २ कोटी वाहन निर्मितीचे लक्ष्य राखणाऱ्या मारुतीने २०२० पर्यंत वार्षिक २० लाख वाहन विक्री नोंदविण्याचे धोरण आखल्याचे मारुती सुझुकीच्या उत्पादन विभागाचे कार्यकारी संचालक राजीव गांधी यांनी ‘वृत्तसंस्थे’ला सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2015 6:28 am

Web Title: maruti crossed one point five crore production milestone
टॅग Business News
Next Stories
1 व्यापक जीवन आणि आरोग्य विमा
2 ब्रिक्स बँकेच्या अध्यक्षपदी के. व्ही. कामत
3 विदेशी गुंतवणूकदारांना पुन्हा सुखद धक्का
Just Now!
X