12 August 2020

News Flash

करोना-टाळेबंदी मुळावर : मारुती सुझुकीवर नुकसान नामुष्की

१७ वर्षांत प्रथमच तिमाही तोटा; तिमाहीत वाहन विक्रीही रोडावली

| July 30, 2020 02:26 am

संग्रहित छायाचित्र

१७ वर्षांत प्रथमच तिमाही तोटा; तिमाहीत वाहन विक्रीही रोडावली

नवी दिल्ली : देशातील अव्वल वाहन निर्माती व प्रवासी वाहन बाजारपेठेत निम्मा हिस्सा राखणाऱ्या मारुती सुझुकीला करोना-टाळेबंदीचा फटका बसला आहे. चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत कं पनीला २६८.३० कोटी रुपयांच्या नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. कमी मागणी, बंद प्रकल्प यामुळे भांडवली बाजारात सूचिबद्ध झाल्यापासून, गेल्या १७ वर्षांत प्रथमच कंपनीने आर्थिक नुकसान सोसले आहे.

मारुती सुझुकीचे गेल्या तिमाहीचे वित्तीय निष्कर्ष बुधवारी जाहीर झाले. यानुसार, जून २०२० अखेर कं पनीला तोटय़ाबरोबरच उत्पन्न घसरणीलाही सामोरे जावे लागले आहे. कं पनीची वार्षिक वाहन निर्मिती क्षमता १५.५० लाख आहे. कं पनीच्या मनेसार प्रकल्पातील काही कर्मचाऱ्यांना कोविड-१९ ची बाधाही झाली होती. सरकारची भागीदारी असलेल्या मारुती सुझुकीची भांडवली बाजारात जुलै २००३ मध्ये सर्वप्रथम नोंदणी झाली होती. कं पनीचे उत्पादन एप्रिलमध्ये पूर्णत: बंद होते. याचा फटका कं पनीच्या उत्तरेतील मनेसार व गुरुग्राम येथील प्रकल्पांना बसला होता. २२ मार्चच्या ४० दिवसांनंतर ते सुरू करण्यात आले. कं पनीने वित्त वर्षभरापूर्वीच्या पहिल्या तिमाहीत १,३७६.८० कोटी रुपयांचा नफा कमाविला होता. तर १८,७३८.८० कोटी रुपयांचे विक्रीतील उत्पन्न नोंदविले होते. गेल्या तिमाहीत ते ३,६७९ कोटी रुपयांनी कमी झाले आहे. एप्रिल ते जून २०२० दरम्यान मारुती सुझुकीच्या एकू ण ७६,५९९ वाहनांची विक्री झाली.

ह्य़ुंदाईच्या क्रे टाला मागणी कायम

टाळेबंदीच्या कालावधीत ह्य़ुंदाई मोटर इंडियाच्या नव्या क्रेटासाठीची मागणी मात्र लक्षणीयरीत्या वाढली आहे. कं पनीने एसयूव्ही गटातील नुकतेच सादर के लेल्या नव्या श्रेणीतील क्रे टाची गेल्या चार महिन्यांत ५५ हजार नोंदणी झाली आहे. कंपनीने मार्चमध्ये ही नवी कार सादर के ली होती.

कोरियन बनावटीच्या ह्य़ुंदाई मोटर इंडियाची कॉम्पॅक्ट एयसूव्ही गटातील पहिली क्रेटा २०१५ मध्ये भारतीय वाहन बाजारात दाखल झाली होती. मारुती सुझुकीच्या ब्रेझाबरोबर तिने यशस्वीरीत्या स्पर्धा केली. क्रेटाचे आतापर्यंत ४.८५ लाख वाहनधारक झाले आहेत.

कॉम्पॅक्ट एसयूव्ही गटातील ह्य़ुंदाईची क्रेटा प्रत्येक महिन्यात विक्रीबाबत अव्वल राहिली आहे. कंपनीच्या ताफ्यातही टाळेबंदी दरम्यान या गटातील कारने सर्वाधिक वाहन विक्री नोंदविली आहे. कं पनीच्या एकू ण वाहनांसाठी होणाऱ्या नोंदणीमध्ये क्रेटासाठीची नोंदणी ही सर्वाधिक, ६० टक्के  आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2020 2:26 am

Web Title: maruti suzuki for the first time in 17 years loss in 1st quarter zws 70
Next Stories
1 गुंतवणूकदारांची नफे खोरी; सेन्सेक्स, निफ्टीची माघार
2 टाळेबंदीसंबंधी अनिश्चितता दूर करा – सीआयआय
3 रिझव्‍‌र्ह बँकेकडून व्याजदर कपात अपेक्षित
Just Now!
X