News Flash

मारुतीकडून अल्टो ८००, के १० माघारी

देशातील सर्वात मोठय़ा वाहन कंपनी मारुती सुझुकीने तिच्या लोकप्रिय अल्टो८०० व अल्टो के१० माघारी बोलाविल्या आहेत.

| March 11, 2015 06:38 am

मारुतीकडून अल्टो ८००, के १० माघारी

 देशातील सर्वात मोठय़ा वाहन कंपनी मारुती सुझुकीने तिच्या लोकप्रिय अल्टो८०० व अल्टो के१० माघारी बोलाविल्या आहेत. स्वस्त श्रेणीत मोडणाऱ्या ३३,०९८ कारच्या दरवाज्यामधील लॅचमध्ये दोष आढळून आला आहे. ८ डिसेंबर २०१४ ते १८ फेब्रुवारी २०१५ दरम्यान तयार केलेल्या या कार आहेत. यामध्ये अल्टो८०० या १९,७८० तर अल्टो के१० या १३,३१८ कार आहेत. उजव्या बाजुचे समोर व मागचे अशा दोन्ही दरवाज्यांच्या लॅचमध्ये दोष असल्याने ही वाहने माघारी बोलावण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. मारुती सुझुकीने डिसेंबर २०१४ मध्ये तिची नवी सिआझ ही प्रिमियम सेदान श्रेणीतील ३,७९६ कारही सदोष क्लचमुळे माघारी बोलाविली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 11, 2015 6:38 am

Web Title: maruti suzuki recalls 33098 units of alto 800 alto k10
Next Stories
1 बडय़ा १० कर्जबुडव्यांकडे सरकारी बँकांचे २८ हजार कोटी थकीत : जयंत सिन्हा
2 म्युच्युअल फंड मालमत्ता १२ लाख कोटी पार
3 ‘ब्लॅक मन्डे’!
Just Now!
X