News Flash

wholesale inflation in may : महागाई नियंत्रणाबाहेर

इंधनाबरोबरच निर्मित वस्तूची महागाई दुहेरी अंकापर्यंत पोहोचली आहे.

अन्नधान्याच्या वाढत्या किमतीपोटी रिझव्‍‌र्ह बँकेसाठी सहनशील अशा ४ टक्क्य़ांच्या पुढे यंदा तो पोहोचला आहे (संग्रहित छायाचित्र)

मे महिन्यात घाऊक किंमत निर्देशांक १२.९४ टक्क्यांवर

नवी दिल्ली : देशात करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने जनजीवन पूर्वपदावर येत असताना महागाईच्या भडक्याचे मोठे आव्हान अर्थव्यवस्थेपुढे उभे राहिले आहे. मे महिन्यातील घाऊक तसेच किरकोळ असे दोन्ही प्रमुख निर्देशांक विक्रमी टप्प्यावर पोहोचले.

गेल्या महिन्यातील घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर १२.९४ टक्क्यांवर झेपावला असून निर्देशांक अस्तित्वात आल्यापासूनचा तो सर्वाधिक ठरला आहे. गेल्या वर्षी टाळेबंदीनंतरच्या मेमध्ये तो उणे (-) ३.३७ टक्के होता. तर एप्रिल २०२१ मध्ये तो १०.४९ टक्के नोंदला गेला होता. यंदा सलग पाचव्या महिन्यात त्यात वाढ झाली आहे.

महागाईत इंधन दरवाढीचा यावेळी जवळपास दुप्पट, ३७.६१ टक्के हिस्सा राहिला आहे. इंधनाबरोबरच निर्मित वस्तूची महागाई दुहेरी अंकापर्यंत पोहोचली आहे. अन्नधान्याच्या महागाईचा दर ४.३१ टक्क्यांवर पोहोचला आहे. प्रामुख्याने या गटातील कांद्याच्या २३ टक्के किमतवाढीचा भार त्यावर पडला आहे. जूनमधील महागाई दर विक्रमी नसला तरी १२ टक्क्य़ांपर्यंत असेल, असा अंदाज ‘इक्रा’ वित्तसंस्थेच्या मुख्य अर्थजज्ज्ञ अदिती नायर यांनी व्यक्त केला आहे.

किरकोळ दरही अधिकच..

’भारतात व्याजदरासाठी महत्त्वाची मोजपट्टी मानला जाणारा किरकोळ महागाई निर्देशांक यंदाच्या मेमध्ये ६.३ टक्के नोंदला गेला. गेल्या सहा महिन्यांतील हा सर्वाधिक स्तर आहे.

’अन्नधान्याच्या वाढत्या किमतीपोटी रिझव्‍‌र्ह बँकेसाठी सहनशील अशा ४ टक्क्य़ांच्या पुढे यंदा तो पोहोचला आहे. आधीच्या, एप्रिलमध्ये किरकोळ ग्राहक किंमत निर्देशांक ४.२३ टक्के होता.

’यंदा अन्नधान्याच्या किमती २ टक्क्य़ांवरून दुपटीने अधिक, ५ टक्के झाल्या आहेत. वाढत्या महागाईपोटी रिझव्‍‌र्ह बँकेने सलग सहाव्यांदा व्याजदर कपात टाळली होती.

इंधन दरवाढीची भर

नवी दिल्ली : देशात इंधन दरवाढ कायम असून, अनेक ठिकाणी पेट्रोलने लिटरमागे शंभरी पार केली आहे. सोमवारी करण्यात आलेल्या दरवाढीमुळे, पेट्रोलने शंभरी गाठलेले हैदराबाद हे मुंबईनंतर देशातील दुसरे महानगर ठरले.

सरकारी तेल कंपन्यांनी सोमवारी पेट्रोलच्या दरात लिटरमागे २९ पैशांनी, तर डिझेलच्या दरात लिटरमागे ३० पैशांनी वाढ केली. सहा आठवडय़ांतील ही २४ वी दरवाढ असून, त्यामुळे देशातील इंधनाचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. २९ मे रोजी मुंबईत पेट्रोलचे दर शंभरीपार गेले होते. सध्या मुंबईत पेट्रोल १०२.५८ रुपये, तर डिझेल ९४.७० रुपये आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2021 3:11 am

Web Title: may wholesale inflation reaches record 12 94 percent zws 70
Next Stories
1 अदानी समूहातील कंपन्यांच्या समभागांची घसरण
2 सेन्सेक्स, निफ्टीचे विक्रमी सातत्य कायम
3 नवीन विमा हप्ता संकलन खासगी कंपन्यांचा वरचष्मा
Just Now!
X