एमसीएक्स-एसएक्स या भांडवली बाजाराला व्यवसाय परवानगी दिल्याच्या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने सेबीचे अध्यक्ष यू. के. सिन्हा यांचीही चौकशी केली आहे.
याबाबत भांडवली बाजार नियामक यंत्रणेचे तत्कालीन अध्यक्ष सी. बी. भावे यांचीही यापूर्वी चौकशी करण्यात आली आहे. त्यांच्यासह सेबीचे माजी सदस्य के. एम. अब्राहम यांचीही चौकशी झाली आहे. सेबीचे माजी अध्यक्ष एम. दामोदरन यांचीही याच प्रकरणात चौकशी होण्याची शक्यता वाढली आहे.
भावे यांच्या २००८ ते २०११ या कारकिर्दीत मंजुरी मिळालेल्या जिग्नेश शहा संस्थापित फायनान्शिल टेक्नॉलॉजिज प्रवर्तित एमसीएक्स स्टॉक एक्स्चेंजचा शुभारंभ फेब्रुवारी २०११ मध्ये सेबीच्या अध्यक्षपदाची सूत्रे घेतल्यानंतर सिन्हा यांच्या हस्ते झाला होता.