फेसबुक, अ‍ॅमेझॉन, ओप्पो आणि व्हिव्हो यासह आघाडीच्या जागतिक कंपन्यांनी कोविड-१९ विरुद्धच्या भारताच्या लढाईला पाठिंबा दर्शवत प्राणवायू, कृत्रिम श्वासन यंत्रणा आदी सुविधा देऊ केल्या आहेत.

अ‍ॅमेझॉन इंडियाने मंगळवारी सांगितले की, देशात आयात करण्यासाठी तिच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्रोताद्वारे १०० कृत्रिम श्वासन यंत्रे खरेदी केली आहेत.

कंपनीने याबाबत आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाशी सहकार्य केले असून १०० मेडट्रॉनिक (एमटी) उपकरणांना त्वरित निधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि ती तातडीसाठी भारतात आणण्यासाठी यासाठीची स्वत:ची अनुकूलता तपासणीही करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. येत्या पंधरवड्यात ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

फेसबुकचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांनी सांगितले की, कंपनी यूनिसेफबरोबर काम करत असून आपत्कालीन प्रतिक्रियांना तातडीने एक कोटी ़डॉलरचे सहकार्य करण्यात येईल. मी भारतातल्या प्रत्येकाचा विचार करतो आणि आशा करतो की लवकरच या वैश्विास महासाथीवर नियंत्रण मिळवण्यात भारतालाही यश मिळो.

फेसबुक तातडीच्या आरोग्य सुविधा प्रतिक्रियेसाठी एक कोटी डॉलरचे सहकार्य करत असून यूनिसेफच्या माध्यमातून याविषयीचे कार्य होईल, असेही स्पष्ट करण्यात आले.