News Flash

‘बीएमसीटी’चा वर्षांअखेर कार्यान्वयनाचा मुहूर्त

क्रेन्सचे वैशिष्टय़ म्हणजे त्या ६५ टन इतक्या वजनाचे कंटेनर ट्वीनलिफ्ट पद्धतीने उचलू शकतील.

Mega Quay Cranes
बीएमसीटी तीन महाकाय पॅनामॅक्स क्वाय क्रेन शुक्रवारी दाखल झाल्याची घोषणा केली.

कंपनीच्या ताफ्यात तीन महाकाय क्वाय क्रेन दाखल

पीएसए इंटरनॅशनल कंपनीचा एक भाग असलेल्या भारत मुंबई कंटेनर टर्मिनल्स प्रा. लि. (बीएमसीटी) तीन महाकाय पॅनामॅक्स क्वाय क्रेन शुक्रवारी दाखल झाल्याची घोषणा केली. विद्यमान २०१७ सालाच्या अखेरीस कार्यान्वयनास सुरुवात करण्याचा बीएमसीटीच्या नियोजनाला यातून आणखी बळकटी मिळाली आहे.

बीएमसीटीच्या सेवेत दाखल झालेल्या क्रेन्सचे वैशिष्टय़ म्हणजे त्या ६५ टन इतक्या वजनाचे कंटेनर ट्वीनलिफ्ट पद्धतीने उचलू शकतील. तसेच त्यांचा आवाका ६३ मीटर अंतरापर्यंतचा आहे. या क्रेनचे उत्पादन व्हिएतनामच्या दुसाँ हेवी इंडस्ट्रीजने केले आहे. दुसऱ्या टप्प्यात आणखी तीन महाकाय क्रेन २०१७ च्या सप्टेंबरमध्ये येणार असून २०१८ आणि २०१९ मध्ये आणखी सहा क्रेन दाखल होणार आहेत. शिवाय याच वर्षी बीएमसीटीच्या ताफ्यात रबर टायरच्या आणखी १८ गॅन्ट्री क्रेन (आरटीजी) दाखल होणार असून त्याद्वारे कंपनीला यार्डातील कामात सहजता आणता येणार आहे, असे बीएमसीटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश अमिरापु यांनी  सांगितले.

शुभारंभासाठी नियोजित तारखेच्या पाच महिने आधीच पहिल्या तुकडीच्या ३ महाकाय क्रेन आमच्या ताफ्यात दाखल झाल्याने वेळेवर काम सुरु करण्याबाबतची हमी अधोरेखित झाली आहे.  भारतातील बंदरे आणि अवजड सामान चढउतार करण्याच्या व्यवसायावर बीएमसीटी आपली वेगळी छाप उमटवणार असून विविध सुविधा आणि डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरच्या रेल्वे गाडय़ांवरील कंटेनर हाताळण्याच्या क्षमतेमुळे बीएमसीटी या क्षेत्रातील आगळी कंपनी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2017 2:02 am

Web Title: mega quay cranes for bmct arrive in mumbai
Next Stories
1 आता मुंबई ते सिंगापूर दररोज उड्डाण सेवा
2 कर्जबुडव्या कंपन्यांच्या रोख्यांबाबत ‘सेबी’चा
3 बीएमडब्ल्यूच्या आलिशान कार श्रेणीत नव्या ‘५ सीरिज’ची भर!
Just Now!
X