02 March 2021

News Flash

मर्सिडिजची ‘डिझायनो’ दाखल

आलिशान मोटारींची निर्मिती करणाऱ्या जर्मनीतील मर्सिडिजने ‘डिझायनो’ श्रेणीतील तीन नव्या अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त मोटारी भारतीय बाजारपेठेत उतरविल्या आहेत.

| July 31, 2015 02:04 am

आलिशान मोटारींची निर्मिती करणाऱ्या जर्मनीतील मर्सिडिजने ‘डिझायनो’ श्रेणीतील तीन नव्या अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त मोटारी भारतीय बाजारपेठेत उतरविल्या आहेत. एएमजी एस ५००कूप, एएमजी एस ६३ कूप, एएमजी जी ६३ ‘क्रेझी कलर्स’ या मोटारींचा यात सहभाग आहे. एकाच वेळी तीन मोटारी बाजारात उतरविण्याची कंपनीची ही पहिलीच वेळ आहे.
भारतीय ग्राहकांची आवड ओळखून त्यांना आपल्या पसंतीची अंतर्गत रचना, हस्तकला निर्मित लेदरच्या सीट, गाडीचा रंग आदींची निवड करण्याची मुभाही याद्वारे मिळणार आहे. या आलिशान मोटारींपैकी एएमजी ६३ कूपे ही मोटार बहुप्रतीक्षित ‘मॅजिक बॉडी कंट्रोल’ प्रणालीयुक्त आहे. मॅजिक बॉडी कंट्रोल ही गाडीच्या सस्पेन्शनचा एक भाग असून यामध्ये उच्च प्रतीच्या कॅमेऱ्याद्वारे रस्त्याची पाहणी करून त्याअनुसार सस्पेन्शन जुळवून घेतो. यामुळे मोटार चालविण्याचा आनंद द्विगुणित होत असल्याचा दावा कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक एबरहार्ड केर्न यांनी केला.
मर्सिडिजने २०१५ मधील पहिल्या तिमाहीमध्ये ४१ टक्क्यांची वाढ नोंदविली असून ६६५९ मोटारी विकल्या गेल्याचे केर्न यांनी सांगितले. तसेच यापुढे आपली कंपनी भारतीय ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या बहुमूल्य सूचनांचा आदर करत मोटारींची निर्मिती करणार असल्याचे आश्वासन दिले. त्
भारतीय लोकांची आवड बदलत असून त्यांना दर्जेदार सेवा पुरविणार असल्याचे केर्न म्हणाले. एएमजी एस ६३ कुपे ही मोटार मर्सिडिजच्या शक्तिाशाली एएमजी श्रेणीतील भारतात दाखल झालेली आठवी मोटार आहे. या मोटारीची किंमत २.६० कोटी रुपये असून यामध्ये स्पोर्टी लुक देण्यात आलेला आहे. तसेच थ्रीडी साऊंड प्रणाली, रात्रीच्या वेळी सुस्पष्ट पाहण्याची क्षमता असलेला कॅमेरा आदी सुविधा आहेत. ‘मॅजिक बॉडी कंट्रोल’ ही यंत्रणा ११२ एमपीएचच्या वेगापर्यंत कार्यरत राहण्याची क्षमता ठेवते.
तसेच रस्त्याचे ४९ फुटांपर्यंत निरीक्षण करून तशा सूचना देते. एस ६३ कूपचे इंजिन व्ही-८ ट्विन टबरेचार्ज श्रेणीतील आहे. ही मोटार फक्त ४.२ सेकंदांत १० ते १०० किमीचा वेग घेते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2015 2:04 am

Web Title: mercedes benz designo launched
टॅग : Mercedes
Next Stories
1 महिंद्रची कडव्या स्पर्धेसाठी सज्जता
2 ‘वाघोबा’बीएनपी पारिबाच्या कळपात
3 इंडोको रेमेडिजची १२५ कोटींची गुंतवणूक
Just Now!
X