मर्सिडिझ बेन्झची बी क्लास १८० सीडीआय ही डिझेलवरील लक्झरी टुरिंग (पर्यटनासाठी आरामदायी) मोटार गुरुवारी येथे आयोजित दिमाखदार समारंभात भारतीय बाजारपेठेमध्ये सादर करण्यात आली. अभिनेता अभय देओल व अभिनेत्री आदिती राव व कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक एबेरहार्ड केर्न यांच्या उपस्थितीत एका पत्रकार परिषदेत या मोटारीचे उद्घाटन करण्यात आले. या निमित्ताने या सेलिब्रिटींच्या माध्यमातून टुरिंग ट्रेल हा उपक्रमही या मोटारीबरोबर सुरू करण्यात आला.
एसयूव्ही व सेदान मोटारीच्या सौंदर्य, तंत्र व आरेखन असा संगम या मोटारीमध्ये असून याच प्रकारची पेट्रोलमधील मोटार मर्सिडिझने यापूर्वी भारतीय बाजारपेठेत उतरविली आहे. त्या मोटारीची ही डिझेल आवृत्ती असून या मोटारीची मुंबई एक्स-शोरूम किंमत २२ लाख ६० हजार रुपये आहे.
या मोटारीच्या संलग्न उपक्रमामध्ये लक्झरी टुरिंग कॅम्पेन ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेत विजयी होणाऱ्या स्पर्धकांना अभय दोओल व आदिती राव यांच्यासह त्यांच्या आवडीच्या पर्यटनस्थळी जाता येणार आहे.
स्पर्धेत भाग घेण्यासाठी या मोटारीची टेस्ट ड्राईव्ह घेऊन त्या मोटारीसह आपले छायाचित्र त्यांना  www.readytob.in  या वेबसाइटवर अपलोड करावे लागणार आहेत. ही मोटार प्रतिलीटरला  १८.९८ किलोमीटर इतके मायलेज देते असा कंपनीचा दावा आहे.