18 July 2018

News Flash

मर्सिडिझची ‘मेड इन इंडिया’ एसयूव्ही नव्या दोन प्रकारात..

मर्सिडिझची ‘मेड इन इंडिया’ एसयूव्ही नव्या दोन प्रकारात.. आलिशान वाहनांच्या निर्मात्या मर्सिडिझ बेन्झची जगात आणि भारतातही सर्वाधिक विक्री होणारे बहुआसनी स्पोर्ट युटिलिटी वाहनाचे (एसयूव्ही) मॉडेल

मर्सिडिझची ‘मेड इन इंडिया’ एसयूव्ही नव्या दोन प्रकारात..
आलिशान वाहनांच्या निर्मात्या मर्सिडिझ बेन्झची जगात आणि भारतातही सर्वाधिक विक्री होणारे बहुआसनी स्पोर्ट युटिलिटी वाहनाचे (एसयूव्ही) मॉडेल ‘जीएलई’चे बुधवारी नवी दिल्लीत ३५० डी आणि २५० डी असे दोन नवीन प्रकार प्रस्तुत करण्यात आले. कंपनीचे भारतातील नवनियुक्त व्यवस्थापकीय संचालक व मुख्याधिकारी रोलँड फॉल्गर हेही यानिमित्ताने पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांना सामोरे गेले.

पुण्यातील प्रकल्प स्थानिक स्तरावर उत्पादित वाहन
२५० डी जीएलई २,१४३सीसी डिझेल इंजिनसह ५८.९० लाख रुपयांपासून सुरू होणाऱ्या किमती
३५० डी जीएलई हे डिझेल प्रकारातच पण २,९८७ सीसी इंजिन क्षमतेत ६९.९० लाख रु. किमतीत उपलब्ध

थायसेनक्रुपचा पुण्यात उद्वाहन निर्मिती प्रकल्प
व्यापार प्रतिनिधी, मुंबई
थायसेनक्रुप या जर्मनीच्या उद्वाहन निर्मात्या कंपनीने तिच्या भारतातून उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला असून, आपला प्रकल्प थाटण्यासाठी पुण्याची निवड केली असल्याचे बुधवारी जाहीर केले. या प्रकल्पाकरिता ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. चाकणमधील हा प्रकल्प २०१७ मध्ये पूर्ण होणार आहे.
पहिल्या टप्प्यात कंपनीच्या प्रकल्पाची उत्पादन क्षमता वार्षिक ६,००० वरून २०१९-२० पर्यंत वार्षिक १०,००० उद्वाहन होईल, असे या वेळी सांगण्यात आले. २०१९-२० पर्यंत कंपनी या क्षेत्रातील दुपटीहून अधिक – १३ टक्के हिस्सा काबीज करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
स्थावर मालमत्ता क्षेत्रात सध्या मंदीचे वातावरण असले तरी निमशहरी भागात घरनिर्मितीला नजीकच्या दिवसात वाढ होईल, असे थायसेनक्रुप एलिव्हेटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक भारत विशनानी यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मायकल थिमॅन हेही या वेळी उपस्थित होते.
भारतीय उद्वाहन बाजारपेठ वार्षिक ११.२ टक्क्यांनी विस्तारित असून २०१८-१९ पर्यंत येथे ९५,००० उद्वाहने तयार केली जातील, असा अंदाजही या वेळी व्यक्त करण्यात आला. थिसेनक्रुपचा सध्या या क्षेत्रात ६ टक्के बाजारहिस्सा आहे.

निस्सानचे ५ टक्के बाजारपेठ काबीज करण्याचे लक्ष्य
व्यापार प्रतिनिधी, मुंबई
भारतीय वाहन बाजारावरील पकड अधिक घट्ट करण्याच्या हेतूनेा जपानच्या निस्सानने भारतीय रसिकांची नस ओळखून आगामी कालावधीत खेळविले जाणाऱ्या विविध क्रिकेट सामन्यांना प्रायोजकत्वाचे हक्क मिळविले आहेत. नियत नवीन उत्पादने तसेच विक्री दालनांच्या विस्ताराद्वारे भारतीय वाहन बाजारपेठेत ५ टक्के हिस्सा मिळविण्याचा मानस यानिमित्ताने व्यक्त करण्यात आला .
भारतीय वाहन बाजारपेठेचा २०२० पर्यंत ५ टक्के हिस्सा काबीज करण्याचा कंपनीचा मानस समोर ठेवून निस्सान येणाऱ्या कालावधीत वाहन विक्रीचे जाळे विस्तारण्यावर तसेच नवीन वाहने सादर करण्यावर भर देईल, अशी माहिती निस्सान मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अरुण मल्होत्रा यांनी दिली. येत्या वर्षभरात कंपनी आणखी १५० दालनांचे जाळे विणेल, असेही मलहोत्रा म्हणाले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांना २०२३ पर्यंत प्रायोजकत्व देण्याचे निश्चित केले आहे. यासाठी इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल(सीसीआय)बरोबर येत्या येत्या आठ वर्षांसाठी करण्यात आलेल्या करारांतर्गत जागतिक विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी, वर्ल्ड ट्वेन्टी२०, १९ वर्षांखालील क्रिकेट सामने तसेच महिला क्रिकेट सामन्यांचा समावेश आहे.

First Published on October 15, 2015 7:32 am

Web Title: mercedes made in india suv car