22 September 2020

News Flash

मारुती-सुझूकी पाठोपाठ मर्सिडिज, महिंद्रचीही किंमतवाढ

मारुती, टोयोटा पाठोपाठ मर्सिडिज बेन्झ आणि मिहंद्र अ‍ॅण्ड मिहद्र यांनीही नव्या २०१३ पासून आपल्या विविध वाहनांच्या किंमतीत वाढ करण्याचे जाहीर केले आहे. वाढता उत्पादन खर्च आणि

| December 12, 2012 02:07 am

मारुती, टोयोटा पाठोपाठ मर्सिडिज बेन्झ आणि मिहंद्र अ‍ॅण्ड मिहद्र यांनीही नव्या २०१३ पासून आपल्या विविध वाहनांच्या किंमतीत वाढ करण्याचे जाहीर केले आहे.
वाढता उत्पादन खर्च आणि पोषक नसलेले आंतरराष्ट्रीय चलन यामुळे हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे मर्सिडिज बेन्झ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक एबरहार्ड केर्न यांनी म्हटले आहे. महिंद्र कंपनी तिच्या सर्व वाहनांच्या किंमती एक टक्क्यावर वाढविणार असून उत्पादन खर्चातील वाढीमुळे हा निर्णय घेत असल्याचे कंपनीच्या वाहन विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण शाह यांनी म्हटले आहे. गेल्याच आठवडय़ात मारुती सुझुकीने २० हजार रुपयांनी किंमती वाढविण्याचे जाहीर केले होते. तर टोयोटा किर्लोस्कर आणि जनरल मोटर्स यांनीही किंमतवाढ स्पष्ट केली आहे. होन्डा, फोक्सव्ॉगन, निस्सान यांनी जानेवारीपासून वाहनांच्या किंमती वाढविण्याच्या निर्णयापत आल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2012 2:07 am

Web Title: mercedes mahendra increased rate after maruti suzuki
Next Stories
1 कर भरा अथवा कारवाईला सामोरे जा
2 विकासकांचा मोर्चा पुनर्विकासाकडे
3 ‘डिजिटायझेशन’नंतरचे पुढचे पाऊल..
Just Now!
X