२.८० कोटी ग्राहकांसह देशातील सर्वात मोठय़ा डीटीएच कंपनीचा उदय

प्रत्यक्ष घोषणेनंतर वर्षभरापासून रखडलेले डिश टीव्ही व व्हिडीओकॉन डी२एचचे एकत्रीकरण अखेर पूर्ण झाले आहे. या रूपाने २.८० कोटी ग्राहकसंख्येसह देशातील सर्वात मोठी डीटीएच ही कंपनी अस्तित्वात आली आहे.

Air India Air Transport Services Limited jobs 2024
AIATSL recruitment 2024 : एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसेसमध्ये मोठी भरती; पाहा नोकरीची माहिती….
Vivo company New Smartphone T3x 5G launch in India on Know About design and price range of this upcoming model
50MP कॅमेरा अन् फास्ट चार्जिंग सपोर्टसह विवोचा ‘हा’ स्मार्टफोन होणार लाँच; किंमत फक्त…
Kia adds two new automatic variants
बाकी कंपन्यांचे धाबे दणाणले, Kia ने सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारचे आणले २ नवे व्हेरिएंट, किंमत…
Top Companies, Lose, Rs 1.97 Lakh Crore , market valuation, infosys, tcs, hdfc bank, hindustan unilever, finance, financial knowledge, financial year end,
आघाडीच्या १० कंपन्यांपैकी पाच कंपन्यांना बाजारभांडवलात १.९७ लाख कोटींची घट

उभय कंपन्यांच्या संचालक मंडळाने याबाबतच्या विलीनीकरणाला नोव्हेंबर २०१६ मध्ये प्रथम मंजुरी दिली होती. यानंतर केंद्रीय माहिती प्रसारण खाते, राष्ट्रीय कंपनी कायदे लवाद तसेच भारतीय स्पर्धा आयोगाच्या परवानगीची प्रक्रियाही या दोन्ही कंपन्यांना करावी लागली. याबाबतच्या प्रस्तावाला भांडवली बाजार नियामक यंत्रणा सेबी तसेच मुंबई व राष्ट्रीय शेअर बाजाराची परवानगी यापूर्वीच मिळाली आहे.

मात्र जानेवारी २०१८ मध्ये डिश टीव्हीने नादारी प्रक्रियेमुळे व्हिडीओकॉन डी२एचच्या विलीनीकरणाबाबत सावध पवित्रा घेतला. व्हिडीओकॉन समूहाने बँकांचे कोटय़वधींचे कर्ज थकविले असून कंपनीचे हे प्रकरण लवादात जाण्याची शक्यता निर्माण झाली होती.

डिश टीव्हीने अखेर दोन्ही कंपन्यांनी एकत्र येण्याच्या प्रस्तावास मंजुरील दिल्याची माहिती गुरुवारी भांडवली बाजाराला दिली. लवादाच्या परवानगीची प्रक्रिया व्हिडीओकॉन डी२एचने पार पाडल्याचेही डिश टीव्हीने स्पष्ट केले आहे. याबाबतची कागदोपत्री प्रक्रिया मुंबईच्या कंपनी रजिस्ट्रारकडेही करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

भारतात सध्या टाटा समूह आणि स्टार यांच्या भागीदारीतील टाटा स्काय ग्राहकसंख्येबाबत डीटीएच क्षेत्रात अव्वल आहे. मात्र आता दोन्ही कंपन्यांच्या एकत्रीकरणामुळे डिश टीव्ही – व्हिडीओकॉन डी२एच अग्रेसर ठरली आहे. झी समूहाच्या अखत्यारीतील डिश टीव्हीचे १.५५ कोटी तर व्हिडीओकॉन डी२एचचे १.२२ कोटी ग्राहक आहेत. २०१६-१७ मध्ये डिश टीव्हीचा ६,०८६.२० कोटी तर व्हिडीओकॉन डी२एचचा १,९९०.९० कोटी रुपयांचा महसूल होता.