21 September 2020

News Flash

‘एमजी मोटर’ भारतात विद्युतकार आणणार

पुढील वर्षी दुसऱ्या तिमाहीच्या कालावधीत कंपनीची पहिली ‘एसयूव्ही’ भारतात सादर होईल.

‘एसएआयसी’ समूह कंपनीची एका चार्जिगमध्ये अधिक अंतर, झटपट चार्जिगची सुविधा

मुंबई : चीनमधील वाहन क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या ‘एसएआयसी मोटर’ची उपकंपनी असलेली ‘एमजी मोटर इंडिया’ ही कंपनी आता भारतात बस्तान मांडण्याच्या तयारीत आहे. येत्या वर्षभरात या कंपनीद्वारे भारतात नवीन कार आणण्यात येणार असून त्यापाठोपाठ विजेवर धावणारी ‘एसयूव्ही’ही आणण्याची घोषणा कंपनीच्या व्यवस्थापनाने केली आहे. भारतात सध्या धावत असलेल्या विद्युत कारच्या तुलनेत एका चार्जिगमध्ये अधिक अंतर कापणारी आणि झटपट चार्जिगची सुविधा असलेली ही कार अद्ययावत तंत्रज्ञानाने सुसज्ज असणार आहे.

‘मॉरीस गॅरेजेस’ ही युरोपीय वाहनकंपनी ताब्यात घेतल्यानंतर ‘एमजी’ या नावाने चीनमध्ये वाहननिर्मिती करणाऱ्या ‘एसएआयसी’ने आता भारतातही प्रवेश केला आहे. गुजरातमधील हल्लोल येथे कंपनीचा वाहननिर्मिती कारखाना उभारण्याचे काम पूर्णत्वास आले असून आता कंपनीने भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे. पुढील वर्षी दुसऱ्या तिमाहीच्या कालावधीत कंपनीची पहिली ‘एसयूव्ही’ भारतात सादर होईल. अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारीत ही ‘एसयूव्ही’ पेट्रोल इंधनावर चालणारी असेल, असे संकेत कंपनीकडून देण्यात आले आहेत. मात्र, त्यानंतर वर्षभरातच भारतात विजेवर चालणारी कार आणण्याचा कंपनीचा मानस आहे. ‘भारताच्या ऊर्जा आणि पर्यावरण धोरणांना सुसंगत ठरेल अशा पद्धतीने एमजी कंपनी जागतिक स्पर्धेला तोडीस तोड ठरेल, अशी ‘एसयूव्ही’ श्रेणीतील इलेक्ट्रिक कार बाजारात आणेल,’ अशी घोषणा ‘एसएआयसी मोटर’चे आंतरराष्ट्रीय व्यापार विभागाचे कार्यकारी संचालक मायकल यांग यांनी शांघाय येथे झालेल्या भारतीय पत्रकारांच्या परिषदेत केली. या कारमध्ये इंटरनेट, कृत्रिम प्रज्ञा (आर्टिफिशियल इंटिजिजन्स), बिग डेटा, क्लाऊड कम्प्युटिंग अशा अद्ययावत तंत्रज्ञानाचा अंतर्भाव केला जाईल, असेही ते म्हणाले.

‘एमजी मोटर इंडिया’च्या हल्लोल येथील प्रकल्पाविषयी माहिती देताना अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजीव छाबा म्हणाले,‘भारतीय बाजारपेठेत दाखल होण्यापूर्वी विविध कार्यक्रमांचे कंपनीच्या वतीने आयोजन करण्यात येणार आहे. ब्रिटन आणि चीनमध्ये या सर्व उत्पादनांचे डिझायनिंग आणि इंजिनिअरिंग करण्यात येणार असले तरी भारतीय अभियंत्यांनाही या प्रक्रियेत सामावून घेतले जाणार आहेत. त्याचप्रमाणे येथील वाहननिर्मिती पूर्णपणे स्थानिक घटकांच्या मदतीनेच करण्यात येईल. यासाठी या वर्षअखेपर्यंत कंपनीतील मनुष्यबळ दीड हजारवर नेण्यात येईल.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2018 2:56 am

Web Title: mg motor will launch electric car in india
Next Stories
1 जेएम फिनान्शिअल क्रेडिट सोल्यूशन्सकरिता आजपासून सुरुवात
2 अतिरिक्त रोकड हस्तांतरण ; समितीचा उतारा!
3 किरकोळ गुंतवणूकदारांना सरकारी रोखे व्यवहार शक्य
Just Now!
X