News Flash

सत्या नाडेलांना ११२ कोटींचे ‘पे पॅकेज’

कारकिर्दीतील दोन दशकानंतर मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी बनलेल्या भारतीय वंशाचे सत्या नाडेला यांचे वर्षांचे मानधन १२ लाख डॉलर या मूळ पगारासह १.८० कोटी डॉलरच्या वर

| February 6, 2014 03:33 am

कारकिर्दीतील दोन दशकानंतर मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी बनलेल्या भारतीय वंशाचे सत्या नाडेला यांचे वर्षांचे मानधन १२ लाख डॉलर या मूळ पगारासह १.८० कोटी डॉलरच्या वर जात आहे. म्हणजेच विद्यमान भारतीय चलनात मूळ पगार महिन्याला ७.५ कोटी रुपये तर वार्षिक ११२ कोटी रुपये होणार आहे. महिन्याला ९.३३ कोटी रुपये ते सरासरी मानधन घेतील.
७८ अब्ज डॉलर समूहाच्या मायक्रॉसॉफ्ट या आघाडीच्या सॉफ्टवेअर कंपनीचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सत्या यांची मंगळवारी नियुक्ती जाहीर करण्यात आली. याचबरोबर ४६ वर्षीय सत्या यांचे कंपनीबरोबर नव्याने करारपत्रही झाले आहे. सत्या हे समूहात १९९२ पासून आहेत. ३०० टक्क्यांपर्यंत लाभांश (३६ लाख डॉलर), १.३२ कोटी डॉलरचे कंपनी समभागही त्यांच्या पदरात पडणार आहे.
मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स व माजी स्टिव्ह बाल्मर यांच्यानंतर सत्या यांच्याकडे कंपनीचे तिसरे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून महत्त्वाची सूत्रे आली आहेत. कंपनीत यापूर्वी त्यांना वेतन म्हणून ६.७५ लाख डॉलर व लाभांश म्हणून १६ लाख डॉलर वर्षांचे मिळत होते.
आंध्रच्या मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
मुळचे आंध्र प्रदेशमधील असलेल्या सत्या यांचे या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ३८ वर्षांच्या सॉफ्टवेअर कंपनीत प्रथमच एका भारतीयाची निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले. सत्या यांचे योगदान मोठे असल्याचे मुख्यमंत्री एन. किरण कुमार रेड्डी यांनी म्हटले आहे.
* भारतीय विद्यार्थी किती सक्षम असल्याचे सत्याने दर्शविले : चिदम्बरम
एखादा भारतीय विद्यार्थी जागतिक स्तरावर किती सक्षम असू शकतो, हे सत्या यांच्या मायक्रोसॉफ्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या निवडीतून स्पष्ट होते, असे गौरवोद्गार केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी काढले आहेत. अमेरिका अथवा चीनमधील विद्यार्थ्यांच्या तुलनेत भारतीय विद्यार्थी किती योग्य आहेत हे सिद्ध झाले म्हणूनच मायक्रोसॉफ्टला तिच्या प्रमुखपदी भारतीय वंशाच्या व्यक्तीची निवड करणे भाग पडले, असेही त्यांनी येथील श्री राम वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपुढे नमूद केले.
‘टॉप टेन’ पंक्तीत सत्या
जागतिक स्तरावरील आघाडीच्या दहा कंपन्यांचे भारतीय वंशाचे मुख्याधिकारींच्या पंक्तीत आता सत्या यांचाही अंतर्भाव झाला आहे. या उद्योगांचा एकूण व्यवसाय ३५० अब्ज डॉलरचा आहे. त्यांची भारतातून होणारी निर्यातही गेल्या आर्थिक वर्षांत ३०० अब्ज डॉलर पुढे गेली आहे.
एल एन मित्तल    अर्सेलर मित्तल    द्द्र ८४ अब्ज
इंद्रा नूयी    पेप्सिको    द्द्र ६६ अब्ज
अंशू जैन    डॉएच्च बँक    द्द्र ४३ अब्ज
इव्हान मेनेंझेस    डिआज्जिओ    द्द्र १८ अब्ज
सत्या नाडेला    मायक्रोसॉफ्ट    द्द्र ७.२ अब्ज
‘आयटी’अन्सचे वेतन
सत्या नाडेला (मायक्रोसॉफ्ट) –
रु.७.५ कोटी (१२ कोटी डॉलर)

एन.चंद्रशेखरन (टीसीएस)
भारतीय माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
रु. ११.६ कोटी

विनीत नायर (एचसीएल टेक)
रु. ८.४२ कोटी
   
अशोक वेमुरी (आयगेट)
रु. ८.१७ कोटी

बालु गणेश अय्यर    
(म्हॅसिस)
रु. ७.४५ कोटी
       
टी. के कुरिअन (विप्रो)
रु. ६.१३ कोटी    

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 6, 2014 3:33 am

Web Title: microsoft ceo satya nadella offered rs 112 cr pay package
टॅग : Satya Nadella
Next Stories
1 इंजिनीअर्स इंडियाची आजपासून भागविक्री; सरकारी तिजोरीत ५०० कोटींची भर अपेक्षित
2 ‘कोलते-पाटील’कडून पुण्यात जमिनीचा सर्वात मोठा व्यवहार
3 साखरेपेक्षा गूळ महाग
Just Now!
X