ल्युमिया ९५० आणि ल्युमिया ९५० एक्सएल या विण्डोज १० प्रीलोडेड असणाऱ्या पहिल्या ल्युमिया फोनची मायक्रोसॉफ्टने सोमवारी भारतात घोषणा केली. प्रभावशाली आणि प्रतिसादावर आधारित तंत्रज्ञानाच्या जोडीला विण्डोज १० ची वैशिष्टय़े देण्याचा प्रयत्न या फोनमध्ये करण्यात आला आल्याचा दावा मायक्रोसॉफ्ट इंडियाचे अध्यक्ष भास्कर प्रामाणिक यांनी यावेळी व्यक्त केला.
या नव्या उपकरणांमध्ये कॉर्टाना, ल्युमियासाठीचे विण्डोज हॅलो बिटा आणि फोन्ससाठीचे कॉण्टिनम अशी काही नाविन्यपूर्ण वैशिष्टय़े देण्यात आली आहेत. एचडी डिस्प्ले, २० मेगापिक्सेल सेन्सर्ससह नवे प्युअरव्ह्यू कॅमेरे आणि ट्रिपल एलईडी नॅचरल फ्लॅश या वैशिष्टय़ांचा समावेश असणारे ल्युमिया ९५० आणि ल्युमिया ९५० एक्सएल अनुक्रमे ४३,६९९ आणि ४९,३९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहेत.