: सातत्याने घसरणाऱ्या खनिज तेलाच्या किमतींनी गुरुवारी प्रति पिंप ५० डॉलरच्या खालची पातळी गाठली. जागतिक बाजारात तेलाचा अतिरिक्त साठा गेल्या काही दिवसांपासून या काळ्या सोन्याचे मोल कमी करणारा ठरला आहे. महिन्याभरात सात डॉलर प्रति पिंप दर घसरणारे तेल आता ४९ डॉलरवर येऊन ठेपले आहे. तेलाने यापूर्वी १४७ डॉलर प्रति पिंप असा सर्वोच्च भाव नोंदविला आहे. तेल उत्पादनात स्वयंपूर्ण होऊ पाहणाऱ्या अमेरिकेच्या इंधन उत्पादनात गेल्या आठवडय़ात ५२,००० पिंपांची वाढ नोंदविली गेली. तेथे आता दिवसाला ९५ लाख पिंप उत्पादन होते.