‘मी जर मंत्री नसतो तर मीच एअर इंडियाच्या खरेदीसाठी दावा केला असता,’ असे वक्तव्य केंद्रीय रेल्वे, वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल यांनी जागतिक आर्थिक परिषदेच्या मंचावरून केले.

कोटय़वधींचा कर्जभार वाहणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील एअर इंडियाचे खासगीकरण लांबले आहे. कंपनीतील निगुर्ंतवणुकीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी बोली मागविण्याची तयारी सुरू आहे. दावोस येथे आयोजित जागतिक आर्थिक परिषदेला संबोधित करताना गोयल म्हणाले की, मी जर मंत्री नसतो तर मला एअर इंडियाच्या खरेदीसाठी बोली लावायला आवडले असते. परिणामकारक नागरी हवाई वाहतुकीचे व्यवस्थापन ही कंपनी उत्तमरित्या हाताळते.

एअर इंडिया तसेच भारत पेट्रोलियमसारख्या प्रस्तावित अन्य कंपन्यांच्या निगुर्ंतवणुकीबाबत गोयल यांनी सांगितले की, देशाची विद्यमान अर्थस्थिती रुळावर येताच निगुर्ंतवणुकीची प्रक्रियाही वेग घेईल. अर्थस्थिती सुधार दिसताच   मौल्यवान अशा सरकारी कंपन्यांमधील निर्गुतवणुकीची प्रक्रिया पार पाडली जाईल, असेही ते म्हणाले.