देशातील सर्वात मोठय़ा स्टेट बँकेने वेगाने वाढत असलेल्या मोबाइल बँकिंगमध्ये निम्मा बाजारहिस्सा काबीज केला आहे. बँकेच्या एकूण खातेदारांपैकी १.५ कोटी खातेदार हे मोबाइल बँकिंगमार्फत व्यवहार करत आहेत. स्टेट बँक ही देशातील सर्वात मोठी बँक आहे. बँकेच्या एकूण किरकोळ ग्राहकांपैकी ४.५ टक्के ग्राहक हे मोबाइल बँकिंगशी जोडले गेलेले आहेत. मोबाइल बँकिंगद्वारे महिन्याला एक हजार कोटी रुपयांची उलाढाल खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेने जुलैमध्ये नोंदविली आहे. मोबाइल बँकिंगमार्फत व्यवहार करणाऱ्यांचे प्रमाण येत्या दोन वर्षांत एकूण खातेदारांपैकी १० ते १२ टक्क्यांपर्यंत जाईल, असा अंदाज आहे.  तर येत्या पाच वर्षांत हे प्रमाण ३० ते ३५ टक्के होईल.