भारतातील दुसऱ्या क्रमांकाच्या भ्रमणध्वनी मनोऱ्यांवर वर्चस्व मिळविण्याचा आंतरराष्ट्रीय अव्वल अमेरिकन टॉवर कंपनीचा मार्ग मोकळा झाला आहे. वायोम नेटवर्क्समधील टाटा टेलिसव्‍‌र्हिसेस व श्रेई इन्फ्रास्ट्रक्चर या दोन भागीदार कंपन्यांनी आपला हिस्सा विकून या व्यवसायातून बाहेर पडण्याची पावले उचलल्यानंतर स्पर्धक अमेरिकन टॉवर्स वायोममध्ये सहभागी होण्यास लगेचच होकार दर्शविला आहे.

अमेरिकन टॉवर्समार्फत वायोम नेटवर्क्समधील हिस्सा खरेदी व्यवहार हा १९,००० कोटी रुपयांचा होण्याचा अंदाज आहे. कंपनीचे देशभरात ४२,००० मनोरे आहेत. तर २.६१ लाख मनोऱ्यांसह इंडस टॉवर ही देशातील क्रमांक एकची कंपनी आहे.
टाटा टेलिसव्‍‌र्हिसेस आणि श्रेई इन्फ्रास्ट्रक्चरची क्विप्पो टेलिकॉम यांच्या भागीदारीतून वायोम नेटवर्क्स ही मनोरे कंपनी २००९ मध्ये अस्तित्वात आली. कंपनीत टाटा समूहाचा सर्वाधिक ५४ टक्के तर श्रेईचा १८.५ टक्के हिस्सा आहे. अन्य हिस्सा खासगी गुंतवणूक कंपन्यांचा आहे.

वायोमसाठी अमेरिकन टॉवर उत्सुक

ग्राहकसंख्या व महसुलात जगातील चौथी मोठी दूरसंचार कंपनी असलेल्या भारती एअरटेलने मंगळवारीच तिचे आफ्रिकेतील ८,३०० मनोरे १.७ अब्ज डॉलरना विकल्याचे जाहीर केले.
ल्ल भारतात ४ लाख मनोरे असून वर्षांला त्यात ३ टक्केच वाढ होत आहे. २०२० पर्यंत देशातील एकूण मनोऱ्यांची संख्या ५.११ लाख होईल.

इंडस टॉवरसाठी
नवे मुख्याधिकारी
भारतातील पहिल्या क्रमांकाच्या इंडसनेही नवी घडामोड नोंदवित कंपनीच्या नव्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बिमल दयाल यांची बुधवारी नियुक्ती जाहीर केली. बी. एस. शांताराजू हे मार्च २०१६ मध्ये निवृत्त होत असल्याने ही नियुक्ती करण्यात येत आहे.