मोटोरोलाचे व्यवस्थापकीय संचालक मार्क्‍स फ्रॉस्ट नवा ई श्रेणीतील ४जी व ३जी तंत्रज्ञानावरील स्मार्टफोन बुधवारी कोलकत्त्यात सादर केला. भारतीय मोबाइल बाजारापेठेत केवळ ई-मंचावरून प्रवेश करणाऱ्या मोटोरोलाने कंपनीच्या स्मार्टफोनची विक्री यापुढेही फ्लिकपार्टवरून कायम राहणार असल्याचे वृत्तसंस्थेकडे स्पष्ट केले. मोटोरोलाची चिनी स्पर्धक कंपनी शिओमी सध्या या व्यासपीठाचा वाढता वापर करत आहे. शिओमीप्रमाणे स्नॅपडिल, अ‍ॅमेझॉनसारख्या ई मंचावर तूर्त न उतरण्याचा मनोदय यावेळी फ्रॉस्ट यांनी व्यक्त केला. शिओमीचे फोन सध्या एअरटेल तसेच द मोबाइल स्टोअरमध्येही उपलब्ध आहेत.