29 September 2020

News Flash

मुथ्थूट फायनान्सची गृह विमा योजना

नैसर्गिक आपत्तीतून सावरण्यासाठी मुथ्थूट फायनान्सने खास करून अल्पउत्पन्न गटासाठी ही पॉलिसी सादर केली आहे.

मुथ्थूट फायनान्सने लिबर्टी व्हिडीयोकॉन जनरल इन्शुरन्सबरोबर सहकार्य करत याद्वारे ग्राहकांसाठी ५०० रुपयांच्या प्रीमियमसह ‘मुथ्थूट फायनान्स’ ही विस्तारित गृह विमा पॉलिसी सादर केली आहे. नैसर्गिक आपत्तीतून सावरण्यासाठी मुथ्थूट फायनान्सने खास करून अल्पउत्पन्न गटासाठी ही पॉलिसी सादर केली आहे. मुथ्थूटचे व्यवस्थापकीय संचालक जॉर्ज अलेक्झांडर यांनी सांगितले की, नसíगक आपत्तींचा परिणाम नेहमी मोठा असतो. कंपनीच्या नव्या योजनेद्वारे संपूर्ण कुटुंबाला जीवन विमा आणि आरोग्य विमा कवचाने सुरक्षित करण्याचा प्रयत्न आहे.
स्टार हेल्थचे २००० कोटींचे विमा हप्ते संकलन
मुंबई : देशातील पहिली स्वतंत्र आरोग्य विमा कंपनी असलेल्या स्टार हेल्थ इन्शुरन्सने २०१५-१६ मध्ये एकूण विमा हप्ते उत्पन्नाचे २००० कोटी रुपयांचे उद्दिष्ट पूर्ण केले असून, या वर्षीचा विकास दर हा ३६ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. याबाबत स्टार हेल्थ अ‍ॅण्ड अलाइड इन्शुरन्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष आनंद रॉय यांनी सांगितले की, स्टार हेल्थ इन्शुरन्सचे ६९ लाख ग्राहकांना विमाकवच आहे. कंपनीचे २०१४-१५ या आधीच्या आर्थिक वर्षांत १४७० कोटी रुपयांचे विमा हप्ते संकलन होते.
अभ्युदय बँकेकडून पंतप्रधान सुरक्षा विमाधारकाला धनादेश वितरण
मुंबई : बँकांमार्फत राबविल्या जात असलेल्या सामाजिक सुरक्षा योजनांपैकी वार्षिक १२ रुपये हप्ता भरून दोन लाखांच्या अपघाती विमा भरपाईचा लाभ देणाऱ्या ‘पंतप्रधान सुरक्षा विमा योजने’अंतर्गत अभ्युदय बँकेने तिचे ग्राहक असलेल्या आरती योगेश जगताप यांना दोन लाखांचा धनादेश सुपूर्द केला. बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक राजीव गांगल व अन्य अधिकाऱ्यांनी विमाधारक महिला जगताप यांच्या घरी जाऊन धनादेश दिला. ही न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनीकडून घेतलेली पॉलिसी असून, त्या अंतर्गत अपघाती मृत्यू, अपघातामध्ये कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास दोन लाखांची विम्याची रक्कम दिली जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2016 3:35 am

Web Title: muthoot finance home insurance plan
Next Stories
1 ‘इक्विटी फंडां’ना ओहोटी; मार्चमध्ये दोन वर्षांतील सर्वाधिक निधीचा निचरा
2 आगामी वर्षांसाठी विक्रीच्या अंदाजात कपात
3 भांडवली बाजारात संमिश्र हालचाल; सेन्सेक्समध्ये वाढ; तर निफ्टीत घसरण
Just Now!
X