भारतातील आघाडीची गोल्ड फायनािन्सग कंपनी आणि मुथूट समूहाची प्रमुख कंपनी असलेल्या मुथूट फायनान्स लि.ने आज मरुदू कोची येथील ला मेरिडियन हॉटेल येथे आपले पहिले मुथूट एटीएम सुरू केल्याची घोषणा केली आहे.
मुथूट एटीएमचे उद्घाटन केरळचे माजी राज्यपाल निखिल कुमार यांनी मुथूट समूहाचे अध्यक्ष एम. जी. जॉर्ज मुथूट आणि मुथूट फायनान्स लि.चे व्यवस्थापकीय संचालक जॉर्ज अ‍ॅलेक्झांडर मुथूट यांच्या उपस्थितीत केले.
यामाध्यमातून कंपनीने पहिले व्हाईट लेबल एटीएम दाखल करून औपचारिक एटीएम नेटवर्कमध्ये प्रवेश केला आहे. कंपनीचे देशभरातील २१ राज्ये व ७ केंद्रशासित प्रदेशात अंदाजे ४,४०० शाखांचे जाळे असून निम-शहरी आणि ग्रामीण भागांत – प्रामुख्याने टिअर ३ व टिअर ४ शहरांत – व्हाईट लेबल एटीएम सुरू करणार आहे.  कंपनीने येत्या तीन वर्षांमध्ये ९,००० व्हाईट लेबल एटीएम स्थापन करण्याचे आव्हान कंपनीने राखले आहे आणि मार्चमध्ये पहिली १०० एटीएम सुरू करण्याचे कंपनीने लक्ष्य राखले आहे. व्हाइट लेबल एटीएम ही सर्वसाधारण बँक एटीएमसारखी असतात. त्यामध्ये पसे काढण्याची व बॅलन्स तपासण्याची सुविधा असते, तसेच स्वतचे शुल्कही असते. बँकांव्यतिरिक्त अन्य वित्तसंस्थांना वित्तीय सेवा पुरविण्यासाठीची ही सुविधा आहे. पसे काढणे व बॅलन्स तपासणे, एका खात्यातून दुसऱ्या खात्यात हस्तांतर, प्रीपेड कार्ड टॉप अप या मूलभूत एटीएम सेवांबरोबरच, मुथूट एटीएम ग्राहकांना मूल्यवíधत सेवाही देणार आहे. कंपनीचे एटीएम वापरणाऱ्यांसाठी लॉयल्टी प्रोग्रॅम सुरू करण्याचे कंपनीचे नियोजन आहे.कंपनी पहिल्या वर्षांत १००० व्हाईट लेबल एटीएम करणार आहे. तर दुसऱ्या वर्षांत २००० आणि तिसऱ्या वर्षांत तब्बल ६००० व्हाईट लेबल एटीएम सुरू केले जाणार आहेत.