News Flash

‘मुत्थूट होमफिन’चे मुंबईत कार्यालय

केंद्रीय संसदीय कार्य व अल्पसंख्यंक व्यवहार राज्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन झाले.

पश्चिम भारतात विस्ताराचे लक्ष्य राखत मुत्थूट समूहातील गृहवित्त क्षेत्रातील कंपनी मुत्थूट होमफिन (इंडिया) लि.ने मुंबईत लोटस कॉर्पोरेट पार्क, गोरेगाव (पूर्व) येथे उद्यम कार्यालय सुरू केले आहे. केंद्रीय संसदीय कार्य व अल्पसंख्यंक व्यवहार राज्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन झाले. या प्रसंगी ‘सिबिल’चे अध्यक्ष एम. व्ही. नायर, मुत्थूट समूहाचे अध्यक्ष एम. जी. मुत्थूट आणि व्यवस्थापकीय संचालक जॉर्ज अलेक्झांडर उपस्थित होते. मुत्थूट समूहाचा हा नवीनतम व्यवसाय असून, आर्थिक वर्ष २०१९ पर्यंत ६,००० कोटी रुपयांचे कर्ज घर-इच्छुकांना वितरित करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2016 5:38 am

Web Title: muthoot homefin office in mumbai
Next Stories
1 वेतन आयोग राबविल्याने अर्थगती वाढेल, तुटीची तूर्तास चिंता नको!
2 संपाचा परिणाम शून्य; मुंबईत स्टेट बँकेच्या शाखांमध्ये नियमित व्यवहार
3 चिनी अ’न’र्थ
Just Now!
X