समभागांशी निगडित योजनांमध्ये गुंतवणूकदारांच्या निढीचा ओघ वाढल्याने देशातील फंडांची मालमत्ता एप्रिल २०१५ मध्ये १० टक्क्य़ांनी वाढली आहे. चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्याच महिन्यात ही मालमत्ता ११.८६ लाख कोटी रुपये झाली आहे.
देशात प्रामुख्याने ४४ फंड घराणी आहेत. त्यांच्यामार्फत गुंतवणूकदारांच्या निधीचे व्यवस्थापन होते. या योजनांमध्ये समभागांमध्ये गुंतविण्यात येणाऱ्या निधीचाही समावेश आहे. फंड कंपन्यांची संघटना असलेल्या ‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया’ (अ‍ॅम्फी) ने याबाबतची ताजी आकडेवारी दिली आहे.
फंड घराण्यांनी सर्वप्रथम फेब्रुवारी २०१५ मध्ये विक्रमी १२.०२ लाख कोटी रुपये गुंतवणूक अनुभवली आहे. तर एप्रिल २०१५ मधील त्यातील गुंतवणूक मार्चपेक्षा १० टक्क्य़ांनी वाढून ती यंदा ११,८६,३६४ कोटी रुपये झाली आहे.
३१ मार्च २०१५ अखेर फंडातील रक्कम १०,८२,७५७ कोटी रुपये होती.