03 March 2021

News Flash

निश्चलनीकरणातून म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत ४०० टक्क्य़ांनी वाढ – आर्थिक सर्वेक्षण

म्युच्युअल फंडांमधील गुंतवणूक ही ४०० टक्क्यांनी २०१६-१७ मध्ये वाढली आहे.

| January 30, 2018 03:08 am

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

सामान्यांच्या बचतीला म्युच्युअल फंड आणि समभागासारख्या वित्तीय साधनांमध्ये गुंतवणुकीचे उत्तम वळण लागले असून, त्यात २०१६-१७ या वर्षांत तब्बल ४०० टक्क्यांची वाढ दिसून आली असल्याचे निरीक्षण आर्थिक सर्वेक्षणाने नोंदविले आहे. नोव्हेंबर २०१६ मध्ये राबविलेल्या निश्चलनीकरणाचा हा सुपरिणाम असल्याचे त्यात म्हटले आहे.

निश्चलनीकरणातून लोकांकडील पैसा हा बँकांकडे ठेवीच्या रूपात आला. शिवाय तो जीवन विमा, समभाग आणि रोख्यांकडेही वळला. या साधनांमधील २०१६-१७ सालातील वाढ ही अनुक्रमे ८२ टक्के, ६६ टक्के आणि ३४५ टक्के इतकी दमदार असल्याचे सर्वेक्षण सांगते.

समभाग आणि रोखे या वर्गवारीत म्युच्युअल फंडांमधील गुंतवणूक ही ४०० टक्क्यांनी २०१६-१७ मध्ये वाढली आहे. २०१५-१६ मध्ये अनुभवल्या गेलेल्या १२५ टक्क्यांच्या वाढीच्या तुलनेत ती लक्षणीय सरस आहे. याचा दोन वर्षांच्या काळात म्युच्युअल फंड गुंतवणूक ही ११ पटींनी वाढली आहे.

देशातील ४२ म्युच्युअल फंड घराण्यांकडील मालमत्ता अर्थात गुंतवणूकयोग्य गंगाजळीही निरंतर वाढत असून, नवीन गुंतवणूक आकर्षिण्याबरोबरच, चालू गुंतवणूकदारांच्या गुंतवणूक मूल्यात वाढीचा हा परिणाम चांगल्या बाजार स्थितीतून शक्य झाल्याची टिप्पणी अहवालाने केली आहे.

चालू आर्थिक वर्षांच्या एप्रिल ते ऑक्टोबरदरम्यान म्युच्युअल फंडात २.५३ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आली आणि ३१ ऑक्टोबर २०१७ अखेर फंडांची एकूण गंगाजळी २१.४३ लाख कोटी रुपयांवर गेली आहे. तर याच कालावधीत गुंतवणूकदारांच्या खात्यांमध्ये ७७ लाखांनी वाढल्याचे सर्वेक्षणाने नमूद केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2018 3:08 am

Web Title: mutual fund investments increase by 400 percent due to demonetization
Next Stories
1 अर्थसंकल्प २०१८-१९  काय अपेक्षित..?
2 सेन्सेक्स-निफ्टीचा मोठय़ा उसळीने नवीन उच्चांक
3 यंदा वित्तीय तूट वाढणार – निती आयोग
Just Now!
X