07 March 2021

News Flash

म्युच्युअल फंडांची गंगाजळी विक्रमी १८.३ लाख कोटींवर!

म्युच्युअल फंडांची एकूण गंगाजळी नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षांत म्हणजे मार्च २०१७ अखेर १८.३ लाख कोटी रुपयांच्या विक्रमी टप्प्यावर पोहोचली आहे. फंडांमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा ओढा वाढल्याने

| April 6, 2017 01:32 am

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

म्युच्युअल फंडांची एकूण गंगाजळी नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षांत म्हणजे मार्च २०१७ अखेर १८.३ लाख कोटी रुपयांच्या विक्रमी टप्प्यावर पोहोचली आहे. फंडांमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा ओढा वाढल्याने वार्षिक तुलनेत त्यात यंदा लक्षणीय वाढ नोंदली गेली आहे.

देशातील विविध फंड घराण्याचे नेतृत्व करणाऱ्या ‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया’ने (अ‍ॅम्फी) दिलेल्या आकडेवारीनुसार, २०१६-१७ या वित्त वर्षांत विविध कंपन्यांच्या म्युच्युअल फंडांमध्ये ३५ टक्के वाढ झाली आहे.

आधीच्या आर्थिक वर्षांत फंडांची एकूण मालमत्ता १३.५३ लाख कोटी रुपये होती. यंदा किरकोळ गुंतवणूकदारांकडून, विशेषत: छोटय़ा शहरांमधून निधी ओघ वाढल्याचे स्पष्ट होत आहे. फंडांमध्ये समभाग निगडित योजनांना गुंतवणूकदारांनी प्रतिसाद दिल्याचे दिसून येते.

फेब्रुवारी २०१७ पर्यंत गुंतवणूक खाती ६७ लाखांनी वाढून एकूण ५.४० कोटींपर्यंत गेली आहेत. गेल्या आर्थिक वर्षांच्या पहिल्या ११ महिन्यात निधी ओघ ४ लाख कोटींनी वाढला आहे. यामध्ये समभाग, समभाग संलग्न बचत योजनांमधील रक्कम ६२,००० कोटी रुपये आहे.

मुंबई, पुणे, दिल्लीसारख्या बडय़ा १५ शहरांव्यतिरिक्त भागातून फंडातील रक्कम ४४ टक्क्यांनी वाढून ३ लाख कोटी रुपये झाली आहे.

देशाच्या म्युच्युअल फंड कंपन्यांमध्ये ४१ जणांचा समावेश असून पैकी ३८ जणांनी निधी ओघ वाढ नोंदविली आहे. तर दोन कंपन्यांनी फंड मालमत्तेतील ऱ्हास अनुभवला आहे. फंड कंपन्यांमध्ये गेल्या आर्थिक वर्षांत महिंद्र म्युच्युअल फंडांचा समावेश झाला. तर जेपी मॉर्गन म्युच्युअल फंड कंपनी बाहेर पडली.

फंड घराण्यांमध्ये सर्वाधिक मालमत्तेसह आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल अव्वल स्थानावर कायम आहे. कंपनीची फंड मालमत्ता २,४२,९६१ कोटींवर गेली आहे. तर २,३७,१७७ कोटी रुपयांसह एचडीएफसी दुसऱ्या स्थानावर आहे. रिलायन्स, बिर्ला सन लाईफ व एसबीआय अनुक्रमे २.१० लाख कोटी, १.९५ लाख कोटी व १.५७ लाख कोटी रुपयांसह पहिल्या पाचमध्ये आहेत.

आघाडीच्या पाच फंड घराण्यांचा एकूण फंड मालमत्तेत ५० टक्क्यांहून अधिक हिस्सा

untitled-13

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2017 1:32 am

Web Title: mutual fund marathi articles
Next Stories
1 ‘सेन्सेक्स’ची सत्रात ३० हजाराला गवसणी
2 रवांडा-भारत व्यापार तिपटीने विस्तारणार
3 मोदी सरकारचे महसुल यश
Just Now!
X