28 September 2020

News Flash

टाटा म्युच्युअल फंडाची ‘मल्टी कॅप फंड’ योजना

‘एस अ‍ॅण्ड पी बीएसई ५००’ हा निर्देशांक या योजनेच्या कामगिरीसाठी मानदंड राहणार आहे.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

मुंबई : टाटा म्युच्युअल फंडाची ‘टाटा मल्टी कॅप फंड’ ही योजना प्रारंभिक गुंतवणुकीसाठी (एनएफओ) गुरुवारपासून ३० ऑगस्टपर्यंत खुली राहणार आहे. त्यानंतर या योजनेतील युनिट्सची खरेदी प्रचलित नक्त मालमत्ता मूल्यानुसार गुंतवणूकदारांना करता येईल.

‘टाटा मल्टी कॅप फंड’ ही योजना गुंतवणुकीस कायम खुली असून फंडाच्या गुंतवणुकीत लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप प्रकारच्या समभागांचा समावेश राहणार आहे. सोनम उदेशी हे या योजनेचे निधी व्यवस्थापक आहेत.

‘एस अ‍ॅण्ड पी बीएसई ५००’ हा निर्देशांक या योजनेच्या कामगिरीसाठी मानदंड राहणार आहे. फंडात गुंतवणुकीसाठी वृद्धी आणि लाभांश असे दोन पर्याय उपलब्ध आहेत.

‘सेबी’च्या आदेशानुसार म्युच्युअल फंड योजनांचे सुसूत्रीकरण झाल्यानंतर टाटा फंड घराण्याच्या टाटा डिव्हिडंट यील्ड फंडाचे ‘व्हॅल्यू फंड’ गटात वर्गीकरण झाले आहे.

या घराण्याचे पाच नवीन फंडांच्या प्रस्तावास ‘सेबी’ने मंजुरी दिली असून नवीन फंड हा याच प्रस्तावाचा भाग आहे.

अन्य योजनाही लवकरच गुंतवणूकदारांना उपलब्ध होणार आहेत. समभागांच्या मूल्यांकनानुसार गुंतवणुकीत लार्ज कॅप आणि मिड कॅप समभाग गुंतवणुकीचे प्रमाण ठरणार आहे.

टाटा समूहाने प्रवर्तित केलेल्या म्युच्युअल फंडाची ३० जून २०१८ अखेर ४९ हजार कोटी इतकी मालमत्ता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 18, 2018 2:49 am

Web Title: mutual fund tata multicap fund tata mutual fund
Next Stories
1 बीएनपी परिबा इंडिया कंझम्प्शन फंड खुला
2 तेल आयात खर्चात २६ अब्ज डॉलरच्या वाढीची भीती
3 रुपयाचा ७०.१५ ऐतिहासिक नीचांक
Just Now!
X