वयाची साठी ओलाडल्यानंतर दरमहा कमाल ५,००० रुपयांपर्यंत निवृत्तीपश्चात वेतनाची (पेन्शन) हमी देणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आलेल्या अटल पेन्शन योजनेला येत्या १ जूनपासून सुरुवात होईल. विद्यमान स्वावलंबन योजनेतील लाभार्थीच या नव्या योजनेत सामावले जातील. 

* पात्रता : वयाची किमान १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या आणि कमाल वयाच्या ४० व्या वर्षांपर्यंतच्या नागरिक
* पेन्शनप्राप्तिसाठी वयानुरूप योगदान देता येईल. योजनेच्या लाभाची निश्चित हमी.
* केंद्र सरकारकडून पहिली पाच वर्षे प्रत्येक पेन्शनकर्त्यांच्या खात्यात दरसाल १००० रुपये अथवा हप्त्याच्या ५० टक्के यापैकी जे कमी असेल तितके योगदान दिले जाईल.|
450