27 May 2020

News Flash

नरेंद्र मोदींची NSC मध्ये आहे पाच लाखांची गुंतवणूक; एक लाखाचे होतात 1.46 लाख रुपये

विशेष म्हणजे बँकेच्या मुदत ठेवींचे दर एनएससीपेक्षा कमी आहेत

National Saving Certificate (NSC) Interest Rate 2019: गुंतवणुकीचा विषय आला की पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ दोन गोष्टींवर अवलंबून राहतात. बँकेतील मुदत ठेवी व नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट किंवा एनएससी. या दोन प्रकारांमध्येच मोदी पैसे गुंतवतात. NSC मध्ये पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून गुंतवणूक करता येते. गेल्या वर्षी मोदींनी एनएससीमध्ये 5,18,235 रुपयांची गुंतवणूक केल्याचे जाहीर केले होते. सर्वसामान्यांच्याही जिव्हाळ्याचा विषय असलेल्या एनएससीचे व अन्य अल्प बचत योजनांचे व्याजदर न बदलण्याचा निर्णय सरकारने नुकताच जाहीर केला आहे. याचा अर्थ पोस्टातील अशा योजनांवर गुंतवणूकदारांना आधीप्रमाणेच 7.9 टक्के इतके व्याज मिळणार आहे.

जर तुम्ही आजच्या तारखेला एक लाख रुपयांची गुंतवणूक एनएससीमध्ये केलीत तर 60 महिने किंवा पाच वर्षांनी तुम्हाला एकंदर 1.46 लाख रुपये परत मिळतील. तर दोन लाखांच्या गुंतवणुकीवर पाच वर्षांनी 2,92,507 रुपये इतकी एकूण रक्कम मिळेल.

मुदत ठेवी वि. एनएससी

विशेष म्हणजे बँकेच्या मुदत ठेवींचे दर एनएससीपेक्षा कमी आहेत. स्टेट बँकेमध्ये पाच वर्षांच्या मुदत ठेवीवर 6.25 टक्के व्याज मिळते, तर याच कालावधीसाठी एचडीएफसी बँक 6.9 टक्के व्याज देते. त्यामुळे स्टेट बँकेतील एक लाख रुपयांचे पाच वर्षांनी 1.35 लाख होतात तर तेवढीच रक्कम एचडीएफसी बँकेत गुंतवल्यास 1.39 लाख रुपये होतात.

एनएससीत गुंतवणूक कशी कराल?

पोस्ट ऑफिसमध्ये एनएससीमध्ये गुंतवणूक करण्याची व्यवस्था आहे. एनएससीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी किमान 100 रुपयांची मर्यादा असून कमाल मर्यादा नाहीये. दरवर्षी चक्रवाढ पद्धतीनं व्याजदर देण्यात येतं, मात्र एनएससीची मुदत संपल्यावरच मूळ रक्कम व व्याज एकत्र दिलं जातं.

NSC: करसवलत

एनएससीमधल्या गुंतवणुकीवर इन्कम टॅक्सच्या 80 सी या कलमांतर्गत करवजावट मिळते. एनएससी कुठल्याही प्रौढ व्यक्तीस स्वत:च्या नावे किंवा अल्पवयीनाच्या नावे किंवा अल्पवयीनालाही खरेदी करता येते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 4, 2019 3:03 pm

Web Title: national saving certificate nsc narendra modi investments
Next Stories
1 RBI ची व्याजदरात पाव टक्क्यांची कपात; गृहकर्जे, वाहनकर्जे स्वस्त होणार
2 येस बँकेचे समूह अध्यक्ष पायउतार
3 ‘पीएमसी बँक घोटाळा’ : खात्यातून रक्कम काढण्याची मर्यादा वाढून २५ हजारांवर
Just Now!
X