News Flash

ओयो हॉटेल्सविरोधात दिवाळखोरीच्या कारवाईला ‘एनसीएलटी’ची मंजुरी

कंपनीकडून याला आव्हान देणारा अर्ज अपील लवादाकडे दाखल

(संग्रहित छायाचित्र)

थकीत १६ कोटी रुपयांच्या वसुलीसाठी ओयो हॉटेल्स अँड होम्स या कंपनीवर दिवाळखोरी कायद्यानुसार कार्यवाही करण्याची याचिका राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण अर्थात एनसीएलटीने बुधवारी दाखल करून घेतली. मात्र कंपनीकडून याला आव्हान देणारा अर्ज अपील लवादाकडे दाखल करण्यात आला.

एका करारासंबंधाने वादंग सुरू असताना १६ लाख रुपयांची रक्कम थकली असताना आणि ओयो समूहातील दुसऱ्याच एका उपकंपनीशी संबंधी हे प्रकरण असताना न्यायाधिकरणाने ओयो हॉटेल्स अँड होम्स प्रा. लि. या कंपनीविरोधात दिवाळखोरीच्या याचिकेला मंजुरी दिल्याचे ऐकून आश्चर्यच वाटले, अशी या संंबंधाने कंपनीच्या प्रवक्त्याने प्रतिक्रिया दिली आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यासंबंधाने अधिक भाष्य न करता, अपील लवादाकडे अर्ज करून या प्रक्रियेला आव्हान देण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2021 12:45 am

Web Title: nclt approves bankruptcy proceedings against oyo hotels abn 97
Next Stories
1 अर्थव्यवस्थेला प्रोत्साहक रोखे खरेदीचा ‘जी-सॅप’ कार्यक्रम
2 करोना लाटेच्या परिणामांच्या चिंतेतून रिझर्व्ह बँकेचा ‘जैसे थे’ पवित्रा
3 बाजाराकडून स्वागत; ‘सेन्सेक्स’ची ४६० अंश झेप
Just Now!
X