25 March 2019

News Flash

गुंतवणुकीसाठी उद्योग क्षेत्र निश्चित करताना सावधानता गरजेची!

कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल आमच्या अपेक्षेप्रमाणे आहेत.

सद्य आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर जगात सर्वाधिक होता. तर तिसऱ्या तिमाहीत निवडक उद्योग क्षेत्रातील कंपन्यांच्या नफ्यातच वाढ दिसून आली. त्या जोरावर भांडवली बाजारातही गेल्या काही दिवसांमध्ये तेजी नोंदली गेली. विश्लेषकांना नवीन गुंतवणुकीसाठी नेमकी कोणते उद्योग क्षेत्र खुणावत आहेत या बाबतीत ‘शेरखान’ या दलाली पेढीचे समभाग संधोधन प्रमुख गौरव दुवा यांची मते लोकसत्ता’ने जाणून घेतली –

बहुतांश कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीचे वित्तीय निकाल जाहीर झाले आहेत. या निकालांबाबत तुमचे निरिक्षण काय आहे?

कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल आमच्या अपेक्षेप्रमाणे आहेत. ज्या कंपन्यांचा ग्राहकांशी थेट संबंध आहे अशा कंपन्यांच्या नफ्यासोबत विक्रीतदेखील वाढ दिसून येत आहे.  भारतीय स्टेट बँक वगळता अन्य कंपन्यांच्या नफ्यात वाढ दिसून आली असून निफ्टीच्या उत्सर्जनात या कालावधीत ११ टक्के वाढ दिसून आली आहे. हे लक्षण गुंतवणूकदार समुसायासाठी निश्चितच उत्साहवर्धक आहे.

गुंतवणूकदारांनी विशेष दखल घ्यावी असे कोणते उद्योग क्षेत्र तुम्हाला योग्य वाटतात?

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या नफ्यात मोठी वाढ दिसून आली नसली तरी कंपन्यांकडून भविष्यातील व्यवसायाबाबतचा सकारत्मक दृष्टीकोन या क्षेत्रातील निवडक कंपन्यांच्या नफावाढीकडे नव्याने लक्ष द्यावे असे वाटते.

बँकांच्या कर्ज मागणीत वाढ दिसून येत आहे. ही वाढ अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याची लक्षणे मानता येतील. मात्र नव्याने गुंतवणूक करताना समभाग गुंतवणुकीतून मिळणारा परतावा मागील वर्षी मिळालेल्या परताव्यापेक्षा कमी असेल हे लक्षात ठेऊन नवीन गुंतवणुकीचा विचार करावा. दुसरा महत्वाचा मुद्दा असा की, भविष्यातील गुंतवणुकीवरील नफा कंपन्यांच्या उत्सर्जन वाढीवर अवलंबून असेल.

जानेवारीपासून विचार केला तर माहिती तंत्रज्ञान निर्देशांकाने लक्षवेधी कामगिरी केली आहे. गुंतवणूकदारांनी माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचा नव्याने गुंतवणुकीसाठी विचार करावा काय?

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या नफ्यातील मोठा हिस्सा परदेशातील ग्राहकांच्या व्यवसायातून येत असतो. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या नफ्यात मोठी वाढ जरी दिसून आलेली नाही.

अमेरिकेची अर्थव्यवस्था मागील दहा वर्षांतील सर्वात अधिक वाढीचा दर नोंदवत आहे. माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी नेमक्या याच गोष्टीमुळे भविष्यातील वाटचालीबाबत सकारत्मक संकेत दिले आहेत.

या अपेक्षेने सुज्ज्ञ गुंतवणूकदार वित्तीय सेवा क्षेत्रातून गुंतवणूक काढून घेत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणूक करताना आढळत आहेत. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांचे दर वर गेले असल्याने माहिती तंत्रज्ञान निर्देशांकाची कामगिरी अन्य क्षेत्रीय निर्देशांकाच्या तुलनेत उजवी आहे. नवीन गुंतवणुकीचा निर्णय आंधळेपणाने घेण्यापेक्षा निवडक कंपन्यांतून टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे हिताचे आहे.

तिमाही निकालांच्या पाश्र्वभूमीवर तुम्हाला नेमके कोणते उद्योग क्षेत्र गुंतवणुकीसाठी खुणावत आहेत, असे वाटते

आम्ही आमच्या गुंतवणूकदारांना माहिती तंत्रज्ञान, तेल आणि नैसर्गिक वायू तसेच खाजगी बँकांमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत आहोत.

First Published on March 6, 2018 1:53 am

Web Title: need to be careful when set industry sector for investment