ग्राहकांच्या संपत्तीवृद्धीची निकड पूर्ण करणारी ‘सिंगल पे एंडोमेंट अ‍ॅश्युरन्स प्लॅन’ ही योजना एडेल्वाइज टोक्यो लाइफ इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडने दाखल केली आहे. मुदतपूर्तीसमयी हमी दिलेले निश्चित स्वरूपाचे लाभ देणारी ही वैशिष्टय़पूर्ण योजना असून एकल विमा हप्त्यावर (सिंगल प्रीमियम) १० पटीइतके विमाकवच या योजनेतून प्रदान केले जाते. या योजनेत भरावयाचा एकल विमा हप्ता (सिंगल प्रीमियम) हा किमान रु. ४०,००० तर कमाल रु. २५,००,००० व त्याहून अधिक असू शकतो आणि हा हप्ता पाच टप्प्यांमध्ये भरण्याचीही सोय आहे. योजनेत पॉलिसी कालावधी हा १० वर्षे असल्याने, दीर्घ मुदतीत निश्चित स्वरूपाचा परतावा केवळ एकदाच एकरकमी गुंतवणूक करून मिळवू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी ती फायदेशीर आहे. या कालावधीत पॉलिसीधारकाला आकस्मिक उद्भवणाऱ्या गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज मिळविण्याची सुविधाही उपलब्ध आहे. पॉलिसीच्या प्रत्यार्पण मूल्याच्या (सरेंडर व्हॅल्यू) ९०टक्के इतके कर्ज या योजनेतील विमाधारक मिळवू शकेल. शिवाय करलाभाचे फायदेदेखील ही योजना प्रदान करते. योजनेतील मुदतपूर्तीचे लाभ मात्र विमा हप्ता भरण्यासाठी वापरात आलेली टप्पेवार पद्धत तसेच प्रवेशासमयी वय आणि विमेदार व्यक्तीचे लिंग यावर आधारीत असेल.