26 February 2021

News Flash

केर्न एनर्जीची वसुलीसाठी नवा मार्ग

भारताकडून १.४ अब्ज डॉलर मिळविण्यासाठी आंतरराष्ट्रीय कायदेशीर लढाई

(संग्रहित छायाचित्र)

 

कर तगादा प्रकरणात अपयश आलेल्या भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय कायदेशीर लढाई लढण्याचा ब्रिटनच्या केर्न एनर्जीने निर्णय घेतला असून १.४ अब्ज डॉलर वसुलीकरिता अमेरिका, ब्रिटनसह अनेक देशांच्या न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे.

भारतातील व्यवसायाद्वारे १०,२४७ कोटी रुपयांची करमागणी देशातील कर विभागाने केर्न एनर्जीकडे २०१४ मध्ये केली होती. कंपनीला २००६-०७ मध्ये समभाग व्यवहाराद्वारे भांडवली लाभ झाल्याचा दावा करत या रकमेत नुकसानभरपाई, व्याज आदींची भर घालत ही रक्कम १.४ अब्ज डॉलर असल्याचे भारताकडून नमूद करण्यात आले.

या लढाईत केर्न एनर्जीला आंतरराष्ट्रीय लवादात यश मिळाले होते. २०११ मध्ये केर्न एनर्जीने भारतातील व्यवसाय, केर्न इंडिया उद्योगपती अनिल अगरवाल यांच्या वेदांता समूहाला विकला होता. लवादाच्या निर्णयावर भारत अद्याप भूमिका घेण्याच्या प्रतीक्षेत आहे. मात्र ही रक्कम केर्न एनर्जीने वसुलीसाठी अमेरिकेतील वॉशिंग्टन न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच ब्रिटन व नेदरलँडमध्ये, कॅनडातही न्यायालयीन लढाई लढणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2021 12:14 am

Web Title: new move to recover cairn energy abn 97
Next Stories
1 सेन्सेक्स ५२ हजाराखाली; निफ्टीत शतकी घसरण
2 सोन्याच्या दराने गाठला आठ महिन्यातील नीचांक; ९४०० रुपयांनी स्वस्त झालंय सोनं
3 अर्थव्यवस्था वेगात
Just Now!
X