फॅशनेबल जेल सोप
फियामा डी विल्स या आयटीसीच्या साबणाच्या नाममुद्रेने देशात प्रथमच फॅशनेबल स्नानानुभवाची अनुभूती आपल्या नवीन ‘कुटूर स्पा जेल बार’या श्रेणीतील तीन प्रकारच्या साबणातून देऊ केली आहे. फॅशन गुरू वेंडेल रॉड्रिक्स यांनी या साबणाच्या रचनेचा विकास केला असून ‘फिल यंग’ असा या साबणांचा घोषमंत्र आहे. हे भारतातील पहिले जेल बार उत्पादनच नाही तर प्राचीन काळापासून कांती उजळ राखण्यासाठी वापरात येणाऱ्या अस्सल सोन्याचा या साबणात प्रथमच वापर झाला असल्याचा कंपनीचा दावा आहे.
व्हीएलसीसीचे नवे फेस वॉश
आरोग्य आणि सौंदर्यप्रसाधन क्षेत्रातील व्हीएलसीसीच्या फेस वॉश, स्क्रब आणि मास्क उत्पादनांची नवी श्रेणी बाजारात आली आहे. नॅचरल सायन्सेस अरेबियन एक्झॉटिका नावाने ही शृंखला असून यामध्ये लिची, आंबा यांचा अंश समाविष्ट करण्यात आला आहे. हिवाळ्यातील मोसमात त्वचेची निगा अधिक कार्यक्षमतेने राखण्यासाठी या उत्पादनांची रचना करण्यात आली आहे. १९५ ते २५९ रुपयां दरम्यान या विविध उत्पादनांच्या किंमती आहेत.
ईगलचे २०१३ ऑर्गेनायझर
चेन्नईस्थित ईगल डायरिजने पॉप्युलर हे २०१३ मधील ऑर्गेनायझर सादर केले आहे. यामध्ये दर दिवसाचे स्वतंत्र पान आहे. २२०बाय१६० मिमी आकारातील हाताने तयार केलेल्या या दिनदर्शिकेची किंमत ५९४ रुपये आहे. देशभरातील निवडक १,००० दालनांमध्ये ते उपलब्ध आहे. त्याला ६ मेटल क्लिप बाईंडर आहे. चुंबक बटण लॉकही त्यात आहे. विविध विषयांची माहिती संचयनाच्या दृष्टीने त्याची रचना करण्यात आली आहे.
नाईटिंगेलची २०१३ डायरी
श्रीनिवास फाईन आर्टस्चा ब्रॅण्ड असलेल्या नाईटिंगेलच्या नव्या वर्षांतील डायरी बाजारात दाखल झाल्या आहेत. प्रिमिअम कॉर्पोरेट आणि विशेष उत्पादने याअंतर्गत सादर करण्यात आली आहेत. या मालिकेतील कॅनव्हास डी आर्ट २०१३ नावाने सादर करण्यात आलेली डायरी विशेष आकर्षक आहे. त्याचबरोबर कामाची नोंदर करण्याच्या दृष्टीने उत्कृष्ट अशी झेन गार्डन २०१३ डायरी आहे. १४७बाय२०६ मिमी आकारातील डायरी ४०० रुपयांना आहे.
पेप्सची अल्ट्रा गादी
देशातील आघाडीचा गादी ब्रॅण्ड असलेल्या पेप्सने अल्ट्रा हे नवे आरामदायी उत्पादन सादर केले आहे. स्पाईन गार्ड इंडिया या लोकप्रिय उत्पादनाची सुधारित आवृत्ती आणि मेमरी फोमचा अंतर्भाव असलेली इनर स्प्रींग गादी याअंतर्गत तयार करण्यात आली आहे. या ८ इंच गादीद्वारे पाठदुखीचे प्रमाण कमी होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याला मजबूत हॅन्डलही देण्यात आले आहेत. ३२ हजार ते ४४ हजार रुपयां दरम्यान अल्ट्राची किंमत आहे.
स्वाईपचा एफ१ फॅबलेट
कॅलिफोर्नियास्थित स्वाईप टेलिकॉम कंपनीने एफ१ फॅबलेट नावाने दुहेरी सिमकार्डवर आधारित नवा ५ इंची टॅबलेट भारतीय बाजारपेठेत सादर केला आहे. ९,४९० रुपयांपासून कंपनीची या क्षेत्रातील उत्पादने उपलब्ध आहेत. ५१२ एमबी रॅम, अ‍ॅण्ड्रॉईज ४.० तंत्रज्ञान, १ जीएचझेड प्रोसेसर, ४जीबी मेमरी, वाय-फाय, दुहेरी कॅमेरा, १२० ग्रॅम वजन आदी त्याची वैशिष्टय़े आहेत. मेमरी ३२ जीबीपर्यंत विस्तारित करता येते तर कॅमेरा ५ मेपा पिक्सलपर्यंत आहे.
इटरनिटीचे ऑपियम गॉगल
इटरनिटी लाईफस्टाईलने ऑपियम नावाने नवे गॉगल सादर केले आहेत. उन्हापासून बचाव करणारे आणि विविध रंग-आकारातील हे गॉगल निवडक दालनांमध्ये उपलब्ध आहेत. ऑपियम वेफेअर्स नावाने गॉगल २,२५० रुपयांपासून पुढे तर आसी बर्लिन ग्युनेथर नावाचे गॉगल २६,९४० रुपयांपासून आहेत. इटालियन आणि जर्मन स्टाईलने या उत्पादनांची रचना करण्यात आली आहे.
टाइल्सचा ‘बेलिसिमो’ थाट
भारत-इटलीची संयुक्त कंपनी असलेल्या ‘एशियन पॅनेरिया लि.ने उच्च-अभिरूचीच्या लक्झरी टाइल्स ‘बेलिसिमो’ या नावाने प्रस्तुत केल्या आहेत. इटालियन स्टाइल वैशिष्टय़, आधुनिक तंत्रज्ञान आणि कल्पकता यांचे प्रतिबिंब या सिरॅमिक टाइल्समध्ये उमटलेले चपखल दिसते. देशातील अव्वल पाच सिरॅमिक टाइल्स निर्मात्यांपैकी एक असलेली एशियन ग्रॅँटिओ इंडिया लि.ने इटलीतील पॅनोरिया ग्रुप इंडस्ट्रीज सिरॅमिक एस.पी.ए.शी भागीदारी करून ही कंपनी स्थापित केली आहे. सध्या एशियन ग्रँटिओच्या देशभरातील २० शोरूम्समध्ये बेलिसिमो टाइल्स उपलब्ध असून, देशभर वितरण जाळे उभारण्यासाठी उभय भागीदारांकडून १०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे.
वेस्टसाईडचा विक्री महोत्सव
नव्या २०१३ वर्षांचा विक्री महोत्सव साजरा करण्यासाठी वेस्टसाईडने विविध वस्तूंच्या खरेदीवर ६० टक्क्यांपर्यंत सवलत देऊ केली आहे. २८ डिसेंबरपासून सुरू झालेल्या या सवलतीचा लाभ मर्यादित कालावधीसाठी असेल. पैकी अनेक योजनांचा लाभ थेट फेब्रुवारी महिन्यापर्यंत घेता येणार आहे. यामध्ये तयार कपडे, घरगुती फर्निचर आदींच्या खरेदीवरही सवलत मिळविण्याची ग्राहकांना संधी आहे.
इंटेक्सचा सिमसमर्थ टॅबलेट
इन्टेक्स टेक्नॉलॉजीजने सिम कार्डावर आधारित टॅबलेट तयार केला आहे. ७ इंची या टॅबलेटची किंमत ७,९९० रुपये आहे. अ‍ॅण्ड्रॉईड ४.०.४ तंत्रज्ञानावर आधारित या टॅबलेटमध्ये १जीएचझेडचा प्रोसेसर आहे. तर दुहेरी कॅमेरा, वाय-फाय, ब्ल्युटूथही आहे. अंतर्गत मेमरी ४जीबी असून रॅम ५१२ एमबी आहे. १५,००० दालनांमधून हे उत्पादन उपलब्ध आहे. यावर निंबुज, स्काईप, फेसबुक, इंडिया टुडे, आजतक आदी माहिती तंत्रज्ञान व्यासपीठही उपलब्ध आहे.
सीडीएक्सचे ‘विंटर वॉर्मर्स’
गारेगार हिवाळ्यात ऊब देणारे चैतन्य ‘विंटर वॉर्मर्स’ या गरम पेयांची संपूर्ण श्रेणी दाखल करून ‘कॅफे कॉफी डे’ने प्रदान केले आहे. तिच्या कॉफी डे एक्स्प्रेस (सीडीएक्स) दालनांमधून ही नवीन श्रेणी फेब्रुवारीअखेपर्यंत उपलब्ध असेल. क्लासिक आयरिश कॉफी, आयरिश हॉट कोको, हॉट आयरिश इंडल्जन्स आणि टँगी ऑरेंज टी अशी ही उत्पादने प्रत्येकी रु. २५ ते रु. ३५ या दरम्यान उपलब्ध असतील.