इन्फिबीम कॉर्पोरेशन च्या इनिशिअल पब्लिक ऑफर (आयपीओ) मध्ये नेक्स्ट ऑर्बटि व्हेंचर्स या मुंबईतील व्हेंचर कॅपिटल फर्म ने ११५ कोटींची गुंतवणूक करण्याची घोषणा केली.   या गुंतवणूकीमुळे आता या व्हीसी कंपनी कडे या ई कॉमर्सतील ५ टक्के हिस्सा मिळवला आहे.   या व्हेंचर कॅपिटल फंडाने प्रथम १४० दशलक्ष डॉलर्सची (रु. ७०० कोटी) गुंतवणूक केली आहे.

कंपनीतर्फे ही गुंतवणूक करताना दाखवलेल्या विश्वासाबद्दल बोलताना नेक्स्ट ऑर्बटि व्हेंचर्सचे व्यवस्थापकीय भागिदार आणि संस्थापक अजय जालन यांनी सांगितले की, ज्यावेळी बाजारपेठेतील अन्य ऑनलाईन रिटेल कंपन्याचे नुकसान होत असतांना आंम्हाला खात्री आहे की या आयपीओ साठी तयार असलेल्या कंपनीतील आमची गुंतवणूक पुढील सहा महिन्यांत लाभदायक सिध्द होईल.

इन्फीबीम इन्कॉर्पोरेशन, ही पहिली ई कॉमर्स कंपनी आहे जी आयपीओ च्या माध्यमातून भांडवल उभारत आहे व त्यांनी आयपीओ साठी ३६०-४३२ रूपये प्रती शेअर चा बॅन्ड ठेवला आहे.