15 December 2017

News Flash

उच्चांकांपासून निर्देशांक आणखी दूर

साप्ताहिक तुलनेत निर्देशांकांनी सलग चौथी सप्ताह वाढ यंदा नोंदविली आहे.

व्यापार प्रतिनिधी, मुंबई | Updated: July 29, 2017 3:03 AM

संग्रहित छायाचित्र

सप्ताहाखेर सेन्सेक्ससह निफ्टीत किरकोळ घसरण; सप्ताह कामगिरी मात्र उत्तम

सप्ताहाची अखेर करताना दोन्ही प्रमुख निर्देशांक त्यांच्या उच्चांकांपासून शुक्रवारी आणखी दुरावले. नव्या महिन्यातील वायदापूर्तीच्या पहिल्या दिवशी सेन्सेक्ससह निफ्टिीत किरकोळ घसरण नोंदली गेली.

६.०५ अंश घसरणीसह निफ्टी १०,०१४.५० वर बंद झाला. तर ७३.४२ अंश घसरणीने सेन्सेक्स ३२,३०९.८८ पर्यंत स्थिरावला. गेल्या सलग दोन व्यवहारातील तेजीमुळे मुंबई निर्देशांकात १५५.०३ अंश भर पडली होती. या दरम्यान सेन्सेक्स ३२,२८३.३० पर्यंत झेपावला होता. तर सत्रातील त्याचा सर्वोच्च टप्पा ३२,६०० नजीक पोहोचला होता.

भांडवली बाजारात शुक्रवारी औषधनिर्माण, पोलाद, स्थावर मालमत्ता, भांडवली वस्तू, बँक आदी क्षेत्रातील समभागांमध्ये घसरण नोंदली गेली. सेन्सेक्समधील डॉ. रेड्डीज्, ल्युपिन, सन फार्मा आदी औषधनिर्माण क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग तब्बल ६ टक्क्य़ांपर्यंत घसरले. त्याचबरोबर आयसीआयसीआय बँक, हीरो मोटोकॉर्प, लार्सन अँड टुब्रो, अ‍ॅक्सिस बँक, हिंदुस्थान यूनिलिव्हर, कोल इंडिया आदी २ टक्क्य़ांपर्यंत घसरले. तर रिलायन्स कॅपिटल, आयटीसी, एचडीएफसी आदी मूल्यवाढीच्या यादीत राहिले.

निफ्टीने शुक्रवारच्या व्यवहारात १० हजाराचा स्तर सोडताना ९,९४४.५० हा तळही अनुभवला. दोन्ही निर्देशांकांनी गेल्या सप्ताहात विक्रमाचा वरचा टप्पा सातत्याने राखला होता.

साप्ताहिक तुलनेत निर्देशांकांनी सलग चौथी सप्ताह वाढ यंदा नोंदविली आहे. या कालावधीत सेन्सेक्स २८०.९९ अंशांनी तर निफ्टी ९९.२५ अंशांनी वाढला आहे. टक्केवारीत ही वाढ एक टक्क्य़ापर्यंतची आहे.

भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेचे आगामी पतधोरण येत्या आठवडय़ात आहे. त्यावर बाजाराची प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. यंदा व्याजदर कपातीची आशा मोठय़ा प्रमाणात व्यक्त केली जात आहे. जूनमधील घाऊक तसेच किरकोळ महागाई दर कमालीचा खाली आल्याने दरकपातीबाबत सकारात्मक वातावरण आहे.

सप्ताहाखेरच्या व्यवहारातील लक्षणीय समभाग :

डॉ. रेड्डीज्                     रु. २,४६२.०५        -६.०८%

आयटीसी                      रु. २९१.२५          +०.९०%

बायोकॉन                     रु. ३९०.१५          -२.२४%

रिलायन्स कॅपिटलरु.    रु. ७१७.४०          +८.८४%

आयडिया                      रु. ९५.५५             +३.१३%

First Published on July 29, 2017 3:03 am

Web Title: nifty closes above 10000 sensex falls 73 points