28 March 2020

News Flash

शेअर बाजार सावरला, सेन्सेक्समध्ये १८०० पेक्षा जास्त अंकांची वाढ

करोना व्हायरसमुळे मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सतत कोसळत होता.

संग्रहित छायाचित्र

सलग दुसऱ्यादिवशी शेअर बाजारातून दिलासादायक बातमी आली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८,३०० अंकांच्या पुढे तर, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक २८,५०० अंकांच्या पुढे बंद झाला. दिवसअखेर सेन्सेक्सने १,८५० अंकांची तर निफ्टीने ५१६ अंकांची वाढ नोंदवली.

करोना व्हायरसमुळे मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सतत कोसळत होता. काल अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी उद्योग क्षेत्राला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी काही महत्वाच्या घोषणा केल्या. त्यामुळे शेअर बाजारात सकारात्मकता निर्माण झाली आहे.

करोना व्हायरसमुळे जगाच्या आर्थिक प्रगतीला खीळ बसली आहे. मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. संपूर्ण भारत लॉकडाउन आहे. पण शेअर बाजार मात्र आता सावरत असल्याचे दिसत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक, यूपीएल आणि ग्रासिम इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. येस बँक, आयओसी, कोल इंडिया आणि गेल यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2020 3:52 pm

Web Title: nifty ends above 8300 sensex up 1860 dmp 82
Next Stories
1 निर्देशांक घसरणीला चाप
2 आर्थिक वर्ष पुढे ढकलले का? राज्य सरकारच्या पत्रकात झाला हा खुलासा
3 सर्व बँकांच्या खातेदारांसाठी अर्थमंत्र्यांच्या दोन मोठ्या घोषणा… पैसै वाचणार
Just Now!
X