राष्ट्रीय शेअर बाजारातील तांत्रिक अडथळा बुधवारी प्रमुख निर्देशांकाच्या पथ्यावर पडला. आठवडय़ातील तिसऱ्या सत्राच्या सुरुवातीपासून निर्देशांक वाढ नोंदवणारा सेन्सेक्स व निफ्टी दुपारच्या खंड व्यवहारानंतर विस्तारित व्यवहार कालावधीत लक्षणीय तेजी नोंदवता झाला. या रूपात दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी त्यांची सप्ताहारंभीची आपटी काही प्रमाणात भरून काढली. मंगळवारी भांडवली बाजारात किरकोळ निर्देशांकवाढीने स्थैर्य होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स बुधवार सायंकाळअखेर १,०३०.२८ अंशवाढीने ५०,७८१.६९ वर पोहोचला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २७४.२० अंशवाढीसह १४,९८२ पर्यंत स्थिरावला. दोन्ही निर्देशांकांत मंगळवारच्या तुलनेत जवळपास प्रत्येकी २ टक्के  वाढ नोंदली गेली.

सेन्सेक्स ३० मध्ये अ‍ॅक्सिस बँक सर्वाधिक, ५ टक्क्यांनी झेपावला. त्याचबरोबर एचडीएफसी बँक व एचडीएफसी लिमिटेड, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, स्टेट बँकही वाढले. गुंतवणूकदारांकडून विशेषत बँक व वित्त क्षेत्रातील समभागांची खरेदी झाली, तर पॉवरग्रिड, डॉ. रेड्डीज्, टीसीएस, एशियन पेंट्स आदी घसरले.

क्षेत्रीय निर्देशांकात दूरसंचार, भांडवली वस्तू, ऊर्जा वाढले, तर बहुपयोगी क्षेत्रीय निर्देशांक घसरला. मुंबई शेअर बाजारातील मिड कॅ प व स्मॉल कॅ प एक टक्क्यापर्यंत वाढले.

निफ्टी सार्वजनिक बँक निर्देशांक

२,४६२.८० (+२.७८%)

निफ्टी खासगी बँक निर्देशांक

१९,३६६.०५ (+३.८७%)

निफ्टी५० सार्वजनिक-खासगी

बँक समभाग मूल्य हालचाल

अ‍ॅक्सिस बँक

७४९.४० (+४.६७%)

एचडीएफसी बँक

१,६०६.४५ (+५.०६%)

आयसीआय. बँक

६४१.१० (+४.०२%)

इंडसइंड बँक

१,०७०.०० (+२.०७%)

कोटक महिंद्र बँक

१,९११.२० (+२.०४%)

स्टेट बँक : ४०६.२५ (+२.६९%)

सलग दोन वर्षांपासून तांत्रिक अडथळा

राष्ट्रीय शेअर बाजार – एनएसईमधील समभागांचे खरेदी-विक्री व्यवहार होणाऱ्या दूरसंचारसंबंधित दोन यंत्रणेमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्याने सकाळी ११.४० वाजता व्यवहार ठप्प करण्यात आले. मात्र दुपारी ३.४५ वाजेपासून व्यवहार सुरू झाल्यानंतर बंदपर्यंत, सायंकाळी ५ वाजेपर्यंत उलट समभागांच्या मूल्यांसह प्रमुख निर्देशांकातील वाढही विस्तारत गेली. दुपारी ३.३० वाजता १४,७०० नजीक असणाऱ्या निफ्टीचा हा सत्रातील तळ राहिला. गेल्या दोन्ही वर्षांत एनएसईला अशाच प्रकारच्या तांत्रिक आव्हानांचा सामना करावा लागला होता.

एनएसईच्या ठप्प व्यवहाराची सेबीकडून चौकशी

तेजीच्या भांडवली बाजारात सकाळच्या सत्रात अचानक ठप्प पडलेल्या समभाग खरेदी-विक्री व्यवहाराची नियामक यंत्रणा सेबीने चौकशी सुरू के ली आहे. बुधवारी घडलेल्या या प्रकरणात आपत्कालीन यंत्रणा सुसज्ज नसल्याबद्दलही राष्ट्रीय शेअर बाजाराची विचारणा के ली आहे. सकाळी ११.४० वाजता व्यवहार ठप्प पडल्यानंतर ते नियमित व्यवहार बंद होण्याच्या दुपारच्या ३.३० वेळेपर्यंत बंदच होते. अखेर दुपारी ३.४५ वाजेपासून व्यवहार सुरू करून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ठेवण्याचा एनएसईचा निर्णय अमलात आला. तांत्रिक कारणास्तव व्यवहार बंद पडल्यानंतर देशातील सर्वात मोठय़ा भांडवली बाजाराने पर्यायी व्यवस्था कार्यान्वित न केल्याबद्दलही सेबीने नाराजी व्यक्त केली.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nifty rises again with sensex abn
First published on: 25-02-2021 at 00:10 IST