27 October 2020

News Flash

‘निफ्टी’ची ११,४०० पुढे मजल!

सेन्सेक्सने २६० अंशांच्या मुसंडीसह दिवसांत ३८,७८८.५१चा उच्चांक नोंदविला होता

संग्रहित छायाचित्र

जागतिक भांडवली बाजारातील सकारात्मक संकेत आणि रिलायन्स इंडस्ट्रीज तसेच एचडीएफसी आणि आयसीआयसीआय या खासगी बँकांना मिळालेल्या खरेदी पाठबळाच्या जोरावर स्थानिक बाजारात निर्देशांकांसाठी बुधवारचे सलग तिसरे वाढ नोंदविणारे सत्र राहिले.

सत्राच्या अखेरीला नफावसुलीमुळे ‘सेन्सेक्स’ मंगळवारच्या तुलनेत फक्त ८६.४७ अंशांच्या कमाईसह ३८,६१४.७९ या पातळीवर बुधवारच्या व्यवहारांना निरोप द्यावा लागला. सेन्सेक्सने २६० अंशांच्या मुसंडीसह दिवसांत ३८,७८८.५१चा उच्चांक नोंदविला होता. बरोबरीने निफ्टी निर्देशांकाने २३.०५ अंश वाढीसह, तांत्रिकदृष्टय़ा महत्त्वाची ११,४०८.४० ही पातळी गाठली.

सेन्सेक्स व निफ्टी मुख्य निर्देशांकांच्या ०.२० टक्क्य़ांच्या वाढीच्या तुलनेत बीएसई मिड-कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांकांमध्ये १.१६ टक्के अशी सरस वाढ हे बुधवारच्या व्यवहारांचे वैशिष्टय़ ठरले.

विदेशी गुंतवणुकीचा निरंतर सुरू असलेला ओघ बाजारातील खरेदीच्या उत्साहाला दुणावणारा ठरला आहे. मंगळवारी विदेशी संस्थांकडून १,१३४.५७ कोटींची समभाग खरेदी केली गेली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2020 12:12 am

Web Title: niftys 11400 ahead abn 97
Next Stories
1 जुलैमध्ये आणखी ५० लाख बेरोजगार!
2 ‘सेन्सेक्स’ची ४७७ अंशांनी झेप
3 तिमाहीत अर्थव्यवस्थेत १६.५ टक्क्यांनी घसरण
Just Now!
X