News Flash

एनकेजीएसबी बँक शनिवारी शाखांचे शतक गाठणार

बहुराज्यात शाखाविस्तार असलेल्या एनकेजीएसबी सहकारी बँक शनिवारी पुण्यात मार्केट

१० हजार कोटींच्या व्यवसायाचेही लक्ष्य
बहुराज्यात शाखाविस्तार असलेल्या एनकेजीएसबी सहकारी बँक शनिवारी पुण्यात मार्केट यार्ड येथे नवीन शाखेच्या उद्घाटनासह शाखांचे शतक गाठेल. महिन्याभरात आणखी पाच शाखा बँक सुरू करणार आहे.
विद्यमान आर्थिक वर्षांतच १०,००० कोटी रुपयांच्या एकूण व्यवसायाचे उद्दिष्ट बँकेकडून गाठले जाईल. ७० टक्के असे उमेद पत-ठेव गुणोत्तर असलेल्या बँकेचे २३ फेब्रुवारी २०१६ अखेर व्यवसायाचे प्रमाण ९,९७८ कोटी रुपये असे असल्याची बँकेचे व्यवस्थापकीय संचालक चिंतामणी नाडकर्णी यांनी माहिती दिली.
आगामी २०१६-१७ हे बँकेच्या स्थापनेचे शतकमहोत्सवी वर्ष असून, ते साजरे करताना बँकेने अनेक कार्यक्रमांची आखणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.
नवीन भौगोलिक क्षेत्रात व नवीन राज्यात विस्ताराच्या योजना आहेत. तंत्रज्ञानावर आधारीत सेवा गुणवत्तेसाठी बँकेने इन्फोसिसच्या ‘पिनॅकल’ प्रणालीवर आधारित अत्याधुनिक डेटा सेंटर विकसित करण्याचे नियोजन आखले आहे. तर बँकेच्या ग्राहकांना विविधांगी वित्तीय उत्पादनांच्या उपलब्धतेसाठी बँकेने म्युच्युअल फंडांच्या वितरणासाठी काही कंपन्यांबरोबर बोलणी सुरू केली असल्याचे त्यांनी सांगितले. २६ सप्टेंबर २०१६ पासून बँकेच्या शतकमहोत्सवी वर्ष सुरू होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2016 12:02 am

Web Title: nkgsb bank nkgsb bank branches
Next Stories
1 सेन्सेक्सची ३२१ अंश घसरण
2 इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सिक्का यांची फेरनियुक्ती
3 कंपनी कर कपातीसह वजावटींना लक्षणीय पाचर बसेल!
Just Now!
X