अनेक गोष्टींवरील वायफळ खर्च कमी करून तसेच वर्षांआड नवीन मोबाइल फोन बदलण्याचा अट्टहास बाजूला ठेवला तर जे काही पसे बचत होतील ते चांगल्या शेअर्समध्ये गुंतवा आणि आठ-दहा वर्षांनी काय फळ मिळते ते पाहा. तात्पर्य, असेल तेव्हा दिवाळी, नसेल तेव्हा शिमगा असे करू नका, असे मागील एका लेखात मी लिहिले होते. जेव्हा जेव्हा महाविद्यालयात मी व्याख्यानाला जातो तेथे हेच प्रकर्षांने सांगत असतो.
नुकतेच दापोली येथील कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थी तसेच प्राध्यापकांसाठी ‘श.शेअर बाजाराचा’ या कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठाचे प्रमुख चोरगे सर यांनी केले होते. उपस्थित श्रोतृवृंदात सुमारे ७० टक्के मुली होत्या. महागडी सौंदर्य प्रसाधने, कपडे यावरील खर्च कमी करून तसेच पॉकेटमनी मधील काही रक्कम वाचवून ती राजीव गांधी इक्विटी बचत योजनेंतर्गत डिमॅट खाते उघडून काही शेअर्स खरेदी करण्यासाठी वापरा, असे आवाहन केले. या योजनेंतर्गत १३२ कंपनींचे शेअर्स आपण घेऊ शकतो. या कंपन्या भारत सरकारने सुचविल्या आहेत. अर्थात, सर्व १३२ कंपनींचे शेअर्स घेणे आíथकदृष्टय़ा शक्य नसल्याने त्यातील काही कंपन्या निवडून त्याचे शेअर्स तर आपण घेऊ शकतो. आनंदाची बाब म्हणजे अनेक विद्याíथनींनी कार्यक्रम संपल्यानंतर भेटून सांगितले की, आम्ही नक्कीच असे करू. कारण डिमॅट खाते उघडायला १५-२० हजार रुपये वगरे लागतात अशी काही चुकीची माहिती त्यांना कुणीतरी सांगितली होती. नुकतेच माझे काही कार्यक्रम ज्यांनी प्रायोजित केले होते, त्या आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार केवळ एक रुपया घेऊन ते डिमॅट खाते उघडतात! भले काही सीमित काळापुरते असेलही, पण अशी सोय असली तर त्याचा फायदा आपण घेऊ शकतो.
चिपळूणमध्ये राहणारी एक विद्याíथनी जी कृषी विद्यापीठातील व्याख्यानाला हजर होती, तिने तर ‘‘मी बाबांना सांगेन की चांगले असलेले फíनचर उगीच जुने झाले म्हणून भंगारात टाकून नवीन बनवू नका आणि ते वाचलेले पसे शेअर्समध्ये गुंतवा,’’ असे वचन देऊन ती बाहेर पडली. नवीन पिढीचा हा दृष्टिकोन नक्कीच आश्वासक आहे. शेअर बाजारातील व्यवहार इतके सोपे आणि सुरक्षित आहेत हे माझ्या दोन तासांच्या व्याख्यानातून समजल्यामुळे तिथल्या तिथे दापोलीतील ब्राह्मण हितवíधनी सहकारी पतपेढीने याच महिन्याचा शेवटी स्वत:च्या खर्चाने दापोलीतील नागरिकांसाठी हे व्याख्यान आयोजित करण्याचे ठरविले आहे. केवळ ठेवी घेणे आणि पसे व्याजाने देणे इतकेच आपले काम आहे असे न समजता त्यापलीकडे जाऊन काही सामाजिक बांधीलकी आहे या भावनेने त्यांनी हा निर्णय घेतला ही स्तुत्य बाब आहे. वाई, रत्नागिरी, लांजा, आचरा, बारामती, कल्याण येथील शासकीय तसेच खासगी वाचनालयांनीदेखील अशा प्रकारच्या व्याख्यानासाठी मला निमंत्रित केले आहे. डीपी आणि डिमॅट खातेदार यांच्यामध्ये जो करार असतो (अॠ१ीेील्ल३) त्यावर लागणारे मुद्रांक शुल्क काढून टाकण्याचा स्वागतार्ह निर्णय सेबीने डिसेंबर २०१३ मध्ये घेतल्याने आता डिमॅट खाते उघडणे हे खर्चीक राहिलेले नाही.
रिलायन्स पेट्रोलियमची शेअर्स सर्टििफकेट माझ्याकडे आहेत त्याचे पुढे काय करायचे असा प्रश्न वसंत तावडे यांचा आहे. फार वर्षांपूर्वीच उपरोक्त शेअर्सच्या बदल्यात रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स कंपनीने भागधारकांना पाठविले आहेत, त्यामुळे सदर शेअर्स आपणास मिळाले नसतील तर कंपनीच्या ‘आरटीए’कडे जाऊन चौकशी करावी. बऱ्याच वेळा कुरिअर कंपनीने आपण घरात नसू तर ते पाकीट परत पाठवलेले असू शकते. मात्र सदर सर्टििफकेट गहाळच झाली असतील तर डुप्लिकेट सर्टििफकेटसाठी त्यांच्याकडून योग्य तो अर्जाचा मसुदा मागवून घ्यावा. हे काम सुमारे दोन महिन्यांत होते.
गेल्या आठवडय़ात गोरेगाव येथे प्रबोधनकार वाचनालयाचे गोिवद येतयेकर यांनी मोठय़ा दिमाखात ‘श.शेअर बाजाराचा’चे आयोजन केले होते. गमतीची बाब म्हणजे या वाचनालयाला लागूनच जॉिगग पार्क आहे तिथे आलेली मंडळी आवर्जून या व्याख्यानाला उपस्थित होती. त्यापकीच एका गृहस्थांनी मराठी वृत्तपत्रातून शेअर बाजार या विषयाला फार कमी म्हणजे अगदी नगण्य जागा दिली जाते त्यासाठी तुम्ही काहीतरी करा, अशी सूचना केली. बऱ्याच अंशी त्यांच्या म्हणण्यात तथ्य आहे हे खरे, पण ‘लोकसत्ता’ने आता संपूर्ण पान या विषयाला दिले आहे याचा मी आवर्जून उल्लेख केला. मात्र गुलाबी इंग्रजी वृत्तपत्रांसारखे सर्व शेअर्सचे भाव त्यात दिले पाहिजेत असा प्रयत्न तुम्ही करा, अशी त्यांची मागणी होती.
जीवन विमा पॉलिसींचे डिमॅट होते, तसेच नवीन पॉलिसीज् डिमॅट स्वरूपात वितरित केल्या जातात याबाबत दोन महिन्यांपूर्वी लिहिले होते. विमा पॉलिसीचे डिमॅट खाते हे वेगळे असते ज्याचा खाते क्रमांक तेरा आकडी असतो. डिपॉझिटरीचे जसे डीपी असतात तसे रिपॉझिटरीचे अस्र्स्र्१५ी िढी१२ल्ल (एपी) असतात. मात्र एका डिमॅट खात्यातील शेअर्स दुसऱ्या कोणत्याही डिमॅट खात्यात हस्तांतरित करता येतात तसे इथे होऊ शकत नाही. कारण तुमची विमा पॉलिसी ही तुमचीच आहे, ती दुसऱ्याला कशी देणार? आजच म्हणजे १७ जानेवारीला सायंकाळी सहा वाजता दादरला दादर सार्वजनिक वाचनालयात सेंट्रल इन्शुरन्स रिपॉझिटरीतर्फे ही सर्व माहिती मिळण्यासाठी आपण सदर संस्थेचे कार्यकारी संचालक सायरस खंबाटा यांना भेटू शकता.
एका ब्रोकर डीपीने तहहयात डिमॅट खात्याला वार्षकि चार्ज नाही अशी स्कीम देऊ केली आहे हे कसे शक्य आहे, असे पालघरहून देवीदास देसाई विचारतात. देवीदासजी, मी तिथे अधिक चौकशी केली तेव्हा कळले की त्या ब्रोकरकडे तुम्हाला ५० हजार रुपये डिपॉझिट ठेवावे लागेल जे बिनव्याजी राहणार असते आणि या व्याजातून हे वार्षकि चार्ज भागवले जातात! There is no free lunch अशी इंग्रज साहेबाच्या देशात म्हण आहेच!!