25 February 2021

News Flash

शेतीवर संपत्ती कर नाही : चिदम्बरम

शेतीवर संपत्ती कर आकारण्यात येणार नाही, असा निर्वाळा अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मंगळवारी लोकसभेत अर्थ विधेयक मांडताना दिला. स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल्सवरील (एसयूव्ही) वाढीव आकारणी मागे

| May 1, 2013 12:31 pm

शेतीवर संपत्ती कर आकारण्यात येणार नाही, असा निर्वाळा अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मंगळवारी लोकसभेत अर्थ विधेयक मांडताना दिला. स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल्सवरील (एसयूव्ही) वाढीव आकारणी मागे घेण्याची शक्यता त्यांनी फेटाळली. पायाभूत सुविधांमधील गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी सरकारी रोख्यांमधील गुंतवणूक आणि उद्योगांसाठीच्या कर्जावरील व्याजाची आकारणी २० टक्क्यांऐवजी पाच टक्के करण्यात येईल, असे जाहीर केले. सर्व मंत्रालयांच्या पुरवणी मागण्या आणि रेल्वे अंदाजपत्रकास सभागृहाने कोणत्याही चर्चेविना मंजुरी दिली. सरकार आणि विरोधकांमध्ये अर्थ विधेयक संमत करण्याबाबत सोमवारी तडजोड झाली होती. या विधेयकाला मंजुरी दिल्यानंतर विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज आणि इतर विरोधी नेत्यांनी सभात्याग केला. स्वातंत्र्यानंतरचे सर्वाधिक भ्रष्ट सरकार, अशी टीका त्यांनी मनमोहन सिंग सरकारवर केली.  सरकारकडून शेतीवर संपत्ती कर आकारला जाण्याची भीती पंजाब-हरयाणातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती. अकाली दलाच्या सदस्यांनी याबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत काँग्रेस पक्षाला धारेवर धरले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2013 12:31 pm

Web Title: no wealth tax on farmer land finance minister
Next Stories
1 बंगाल उपसागराखाली केबलप्रणाली
2 उद्वाहन, सरकते जिने पुरवठय़ाचे ‘ओटिस’ला मोठे कंत्राट
3 केंद्राकडून राज्याकडे ‘क्रिस-झिरप’ प्रयोग!
Just Now!
X