मुंबई : रिझव्‍‌र्ह बँकेने डिसेंबर २०१९ पर्यंतच्या आकडेवारीवर आधारित प्रसिद्ध केलेल्या आर्थिक स्थिरतेच्या अहवालानुसार जुलै – डिसेंबर २०१९ कालावधीत बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांना वाणिज्यिक बँकांनी सर्वाधिक कर्जवाटप केले आहे. वित्तीय प्रणालीतील दायित्वाचे विश्लेषण केल्यास जुलै २०१८ ते सप्टेंबर २०२१९ दरम्यान बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांच्या बँकांकडून घेतलेल्या अर्थसहाय्यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. जून २०१८ मध्ये बँकिंग वित्तीय कंपन्यांना एकूण दायित्वापैकी ४२.३५ टक्के बँकांना देणे होते.

जून आणि डिसेंबरपर्यंतच्या बँकिंग सांख्यिकीचे विश्लेषण या अहवालात होत असते.

डिसेंबर २०१९ मध्ये बँकांचे दायीत्व ४८.४ टक्कय़ांपर्यंत वाढल्याचे या अहवालात समोर आले आहे. या कालावधीत म्युच्युअल फंडाच्या दायीत्वात घट होऊन ते ३३ टक्क्य़ांवरून २५ टक्के कमी झाले. बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांच्या दायीत्वात ३१ मार्च २०१७ रोजी भांडवली बाजारातून बिधि उभारणीचे प्रमाण ५६ टक्के होते.

बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांची भांडवली बाजारातून निधी उभारणी कमी होत २०१७ – २०१९ दरम्यान बँकाच्या कर्जावरच्या आणि म्युच्युअल फंडाच्या दायीत्वात वाढ होत डिसेंबर २०१८ मध्ये एकूण दायित्वाच्या ७४ टक्के दायित्व बँका आणि म्युच्युअल फंडाचे होते. या कालावधीत बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांच्या एकूण देण्यापैकी ४८ टक्के बँकांना २६ टक्के म्युच्युअल फंडना तर २१ टक्के विमा कंपन्यांना देणे होते. २०१८ पश्चात बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांना बँकांच्या अर्थसाहाय्यावर अधिक अवलंबून राहावे लागल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.