News Flash

पत इतिहास नसलेल्यांनाही कर्ज-प्राप्ती सुलभ!

अल्प किंवा अजिबात पत नसलेल्या परंतु पसे कर्जाने घ्यायची इच्छा

अल्प किंवा अजिबात पत नसलेल्या परंतु पसे कर्जाने घ्यायची इच्छा असलेल्या अर्जदारांचे काय करायचे, असा एक मोठा प्रश्न अनेक वित्त पुरवठादारांपुढे असतो. वास्तविक बँका व अन्य पत यंत्रणांनाही हा प्रश्न अनेक वष्रे आव्हानात्मक ठरत होता. अतिशय कमी पत इतिहास असलेले अर्जदार म्हणजे संधीही असते आणि जोखीमही असते.
अमेरिकेतील २००८ नंतरच्या आर्थिक संकटानंतर अशा व्यक्तींना कर्ज देण्याबाबतची भीती अधिक वाढली. परंतु त्याच वेळी जोखमीचे मूल्यमापन कशा प्रकारे करता येते आणि प्राप्त स्थितीत काय स्वीकारार्ह काय आहे या विचारसरणीत कमालीचा बदल झाला आहे. अनेक कारणांमुळे तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याचा वेग कमी असलेल्या क्षेत्रांमध्ये वित्तीय क्षेत्रही एक आहे आणि याचाच अर्थ बरेचसे निर्णय चुकीची आकडेमोड, बँकतज्ज्ञांचे अंदाज आणि काही वेळा पूर्णत: लोभावर आधारित होते. परंतु तंत्रज्ञानामुळे आता व्यक्तीच्या पत आढाव्याबद्दल आणि त्याच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेबद्दल अधिक चांगले चित्र दिसू शकते.
आजच्या घडीला कर्जासाठी अर्ज करणाऱ्याला कर्ज द्यायचे की नाही याचा निर्णय घेण्यासाठी अंदाजे विविध २०० आघाडय़ांवर पडताळून पाहिले जाते. ही प्रक्रिया पूर्णत: तंत्रज्ञानावर आधारित असते. त्यामध्ये मानवी हस्तक्षेप अजिबात नसतो. अल्प पत इतिहास असलेले सगळेच अर्जदार जोखमीचे असतात असेही नाही, हे आतापर्यंतच्या निरीक्षणातून सिद्ध झाले आहे.
सध्या उपलब्ध असलेले पर्यायी मार्ग कशा प्रकारे व्यक्तीच्या कर्ज घेण्याच्या आणि परतफेडीच्या क्षमतेवर प्रकाश टाकू शकतो? याचे उत्तर म्हणजे, डाटा. उदा. व्यक्तीच्या मोबाइल फोनचे बिल आपल्याला त्या व्यक्तीविषयी खूप काही सांगू शकते. त्या व्यक्तीचे फोन बिल किती येते, ते वेळेवर भरले जाते का इत्यादी आधुनिक फोनमुळे ‘जिओ-टॅिगग’ शक्य होते आणि यामुळे अर्जदारातील क्षमता काय आहे आणि अर्जदाराची जीवनशैली कशी आहे, याचे चांगले चित्र मिळू शकते. फोनमुळे मोठय़ा प्रमाणात डाटा मिळू शकतो आणि याचे उदाहरण म्हणजे एखाद्यामध्ये नराश्याची लक्षणे आहेत का याचा ८७% अचूक अंदाज ‘जर्नल ऑफ मेडिकल इंटरनेट रिसर्च फोन डाटा’च्या अंदाजानुसार वर्तवता येऊ शकतो.
याबाबत या अभ्यासातील एक लेखक व ‘नॉर्थ वेस्टर्न युनिव्हर्सटिी फेनबर्ग स्कूल ऑफ मेडिसिनमधील सेंटर फॉर बिहेव्हिअरल इंटरव्हेन्शन टेक्नालॉजिज’चे संचालक डेव्हिड मोर यांनी, लोक जितका अधिक वेळ त्यांच्या फोनवर घालवतात तितके त्यांना नराश्य आल्याची शक्यता अधिक असते, असे निरीक्षण नोंदविल्याचे ‘टाइम’ मासिकात म्हटले आहे.
कर्जाविषयी निर्णय घेण्यासाठी पर्यायी डाटाचा वापर करणाऱ्या लोकांसाठी सहसंबंध दर्शवण्यासाठी मोबाइलवरून अनेक डाटा पॉइंट वापरता येऊ शकतात.
आज माहितीचा अन्य मोठा स्रोत म्हणजे तमाम माध्यमे. त्याचा वापर करणे म्हणजे अर्जदार जसा असल्याचा दावा करतो त्याची खातरजमा करून घेणे आणि कर्जाबाबत त्यावर विश्वास ठेवता येऊ शकतो का हे चाचपणे. आपल्या लोकसंख्येचा मोठा भाग हा औपचारिक बँकिंग व्यवस्थेच्या बाहेर आहे. मोबाइलद्वारे इंटरनेटचा प्रसार झाला असल्याने अशा अनेक व्यक्तींचे डिजिटल अस्तित्व असल्याचे दिसून येते. बहुतांश बाबतीत कर्जाच्या बाबतीत निर्णय घेण्यासाठी ही बाब पुरेशी आहे. याबाबतची गणिते मांडण्यासाठी आणि अर्जदाराबाबत अधिक चांगले चित्र कळण्यासाठी याचा उपयोग होतो. थोडे मागे वळून पाहिल्यास, सावकार जेव्हा कर्जदारांना पसे देत तेव्हा ते त्या व्यक्तीला स्वत: ओळखत असल्याची किंवा त्याच्याशी संबंधित कोणाला तरी ओळखत असल्याची खात्री करत. सध्याची संकल्पनादेखील यासारखीच असून कर्ज हवे असलेल्यांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आपण समाज माध्यमांचा उपयोग करतो. जोखीम घेण्याची क्षमता जोपासण्यासाठी पारंपरिक नसलेल्या डाटाचा वापर करतो.
‘स्मार्टअप लीगल’ने अलीकडेच एक मत नोंदवले आहे. ते म्हणजे, प्रामुख्याने पत जोखीम मोजण्यास मदत करण्यासाठी असलेले पेटंट फेसबुकला देण्यात आले आहे. एखादी व्यक्ती कर्जासाठी अर्ज करते तेव्हा कर्ज देणारा घटक त्या अर्जदाराच्या समाज माध्यमाशी (खाते) व व्यक्तीशी अधिकृत मार्गाने जोडलेल्या व्यक्तींचे पतमानांकन तपासून पाहतो. या व्यक्तींचे सरासरी पतमानांकन किमान सर्वात कमी पत गुणांकन असले तरी कर्जदाता हा अर्जदाराच्या अर्जावर प्रक्रिया करतो. अन्यथा, कर्जाचा अर्ज नाकारला जातो, असे पेटंट तपशिलात म्हटले आहे.
यानंतर कर्जदारांच्या शिक्षण व व्यवसाय याविषयी काही पलू असतात. शिक्षणामुळे व्यक्तीची जोखीम घेण्याची क्षमता बदलते, असे सर्वसाधारण मत आहे. डाटादेखील तेच सांगतो. तसेच कर्जदारांपैकी काहींची नोकरी ही इतरांपेक्षा फार सुरक्षित असते आणि व्यक्ती बेरोजगार राहण्याची शक्यता तुलनेने कमी असते. मोठय़ा डाटाबेसमुळे असे सहसंबंध जोडता येऊ शकतात. त्यांचा वापर अन्य डाटासोबत संभाव्य अर्जदारांसंदर्भातदेखील केला जातो.
पत इतिहास अल्प असलेली किंवा अजिबात नसलेली व्यक्ती आपोआप नाकारली जाते का? नक्कीच नाही. माहितीच्या पर्यायी स्रोतांमुळे कर्ज देण्याची व घेण्याची प्रक्रिया यामध्ये कमालीचे बदल झाले आहेत. आज अतिशय सर्वसामान्य घटकांमध्ये घरगुती देयकांचा (पेमेंट) समावेश आहे. जसे की, भाडे, विविध देयके, समाज माध्यमांवरील अस्तित्व. कोणतीही गोष्ट बिनचूक असू शकत नाही; पण असे पर्यायी डाटा तुलनेने सुरक्षित मार्ग दाखवू शकतात.

– रजत गांधी 

(लेखक फेअरसेन्ट.कॉम या भारतातील पहिल्या पी२पी व्यवस्थेचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2016 8:04 am

Web Title: now easy to take loan for who dont have credit history
टॅग : Loan,Marathi News
Next Stories
1 आयुर्वेदाची महती जगभरात पोहोचविण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेबरोबर सामंजस्य करार
2 मुंबई-पुण्यातील सात बिगरबँक वित्तीय कंपन्यांकडून परवाने परत
3 बँक ऑफ बडोदाचे विमा कंपन्यांशी करार
Just Now!
X